लॉकडाऊनमुळे खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांना भरपूर वेळ द्यायला मिळत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हेही एकत्र वेळ घालवत आहेत.
11 डिसेंबर 2017मध्ये या दोघांनी कुटुंबातील मोजक्याच माणसांसह इटलीत विवाह केला. त्यानंतर सततचे दौरे आणि चित्रिकरणात व्यग्र असल्यामुळे विराट-अनुष्का यांना एकमेकांना पुरेसा वेळ द्यायलाच मिळाला नाही.
लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले. विराटनंही ते कबुल केलं की दोन वर्षांत अनुष्कासोबत सर्वाधिक वेळ घालवता आला.
विराट नेहमी अनुष्काचं कौतुक करतो. तिच्यामुळे रागावर नियंत्रण राखण्यास शिकल्याचं त्यानं अनेकदा जाहीररित्या सांगितले आहे.
लॉकडाऊनमुळे एकमेकांसोबत बराच वेळ घालवणाऱ्या या जोडीचे कॅनडिड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विराट-अनुष्का यांनी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला मदत केली आहे.
या दोघांनी महाराष्ट्र पोलिसांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयेही दिले आहेत