Sachin Tendulkar's London House : महान फलंदाज सचिन तेंडुलकरला गुरुवारी लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पाहून चाहत्यांना आनंद झाला. भारत-इंग्लंड यांच्यातला दुसरा वन डे सामना पाहायला सचिन पत्नी अंजलीसह आला होता आणि सचिन व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या एकत्रित फोटोने सोशल मीडियावर हवा केली होती.
सचिन बऱ्याचदा लंडन दौरा करतो. त्याचा मुलगा अर्जुन व मुलगी सारा हे दोघेही लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तेही बऱ्याचदा लंडनमध्येच असतात. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे मुंबईतील आलिशान घर सर्वांनाच माहित आहे, परंतु लंडनमध्येही त्याचा एक आलिशान अपार्टमेंट आहे, हे फार कमी चाहत्यांना माहित्येय.
क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या जवळच सचिन तेंडुलकरचे हे अपार्टमेंट आहे. NBT ने याबाबत माहिती दिली होती आणि Lords View Two या इमारतीत सचिनचे अपार्टमेंट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सचिनचं खरंच लंडनमध्ये घर आहे का याबाबत अधिकृत माहिती कुठेच नाही.
सचिनचे अपार्टमेंट ज्या Lords View Two मध्ये असल्याचा दावा केला जातोय. त्या इमारतीतील अपार्टमेंट साधारणपणे असे आहेत...