चेतेश्वर पुजारा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी भारताला कडवी झुंज दिली.
भारतीय संघाने या विजयाबरोबरच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये 1947 सालापासून दौरा करत आहे.
पण यापूर्वी एकाही दौऱ्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना जिंकता आला नव्हता.
त्यामुळे गेल्या 71 वर्षांमध्ये भारताने पहिल्यांदाच पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे.