न्यूझीलंडच्या फलंदाजंनी धडेकाबाज फलंदाजीचा नमुना पेश केला.
न्यूझीलंडकडून कॉलिन मुनरो आणि रॉस टेलर यांनी झंझावाती अर्धशतके झळकावली.
कॉलिन मुनरोने न्यूझीलंडला दणक्यात सुरुवात करून दिली.
भारताकडून जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांनी चांगली गोलंदाजी केली.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतापुढे २०४ धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने रोहित शर्माला झटपट गमावले.
त्यानंतर मात्र लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी ९९ धावांची भागीदारी रचली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला.
राहुलने यावेळी ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर कोहली जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही.
कोहलीला यावेळी अर्धशतकासाठी पाच धावा कमी पडल्या. राहुल आणि कोहली हे दोघे बाद झाल्यावर भारत हा सामना जिंकणार की नाही, असे वाटत होते.
त्यानंतर श्रेयस अय्यरने तुफानी अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.