भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना गुवाहाटीच्या मैदानात रंगणार आहे.
गुवाहाटीत तब्बल सात वर्षानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येत असून, या शहरात हा पहिला टी-२० सामना खेळविण्यात येत आहे.
या सामन्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांनी मैदानात सराव केला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
डकवर्थ लुईस नियमानुसार पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाला क्लिन स्वीप देण्यासाठी विराट ब्रिगेड उत्सुक असेल.