महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर ही पॉप्युलर स्टार किडपैकी एक आहे. ती प्रसिद्धीपासून दूर राहत असली तरी सोशल मीडियावर तिचे जवळपास १७ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या नावानं अनेक फॅनपेजही आहेत. ( Photo credit : saratendulkar/instagram)
२४ वर्षीय सारानं लंडन युनिव्हर्सिटीतून मेडिकल ग्रॅज्युएटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि नुकतंच तिनं मॉडलिंग क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.
सारा तेंडुलकर ही भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याला डेट करत असल्याच्या चर्चाही रंगतात. ही दोघं सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत असल्यानं या चर्चा रंगल्या आहेत, परंतु अजूनही कोणाकडूनही त्याला दुजोरा मिळालेला नाही.
सचिन तेंडुलकरनं सहारा कप जिंकला आणि आणि त्यानं त्याच्या मुलीचं नाव सारा असं ठेवल्याचं सांगितलं जातं. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सचिनची ती पहिलीच स्पर्धा होती आणि त्यामुळे हा विजय त्याच्या अगदी जवळचा आहे.
साराला जगभर भ्रमंती करायला आवडते. आतापर्यंत ती फ्रान्स, इंग्लंड, इंडोनेशिया, दुबई, इत्यादी देशांत फिरली आहे.
सारानं नुकतंच एका प्रसिद्ध ब्रँडसाठी मॉडलिंग केलं. तिच्यासोबत अभिनेत्री बनिता संधू आणि तानिया श्रॉफही झळकल्या होत्या.
सारानं धिरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ती पदवीसाठी लंडनमध्ये गेली. सारानं लंडन युनिव्हर्सिटीतून मेडिकल पदवी घेतली आहे. तिची आई, अंजली ही पण डॉक्टर आहे.