शुभमन गिलच्या बहिणीची इन्स्टाग्रामवर ती पोस्ट अन् त्यावर सारा तेंडुलकरची रिॲक्शन, चर्चांना उधाण

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगत असतात.

भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिल सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे. सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने द्विशतक झळकावले. तर दूसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ४० धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगत असतात. शुभमन गिलने द्विशत झळकवल्यानंतरही त्याचे आणि सारा तेंडुलकरचे फोटो लावलेले मीम्स तयार करण्यात आले होते. मात्र याचदरम्यान आता शुभमन गिलची बहिण शाहनील गिल हिची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.

शुभमन गिलची मोठी बहीण शाहनील गिल इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहे. शहनील गिलने तिच्या मैत्रिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत.

शाहनील गिलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने मिनी स्कर्टसोबत काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

शाहनील गिलची पोस्ट सारा तेंडुलकरने लाइक केली आहे. सारा अजूनही शहनीलच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

मात्र शाहनील गिलच्या पोस्टपेक्षा सारा तेंडुलकरने दिलेली रिअॅक्शनची चचर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

शाहनील एक फॅशन प्रेमी आहे. शहनीलच्या फॅशन सेन्समुळे ती सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.

शाहनील गिल हिला इन्स्टारील बनवण्याची देखील खूप आवड आहे. इंस्टाग्रामवर शाहनील गिलचे जवळपास ५५ हजार फॉलोअर्स आहेत.

शुभमन गिलला सिमरन नावाची आणखी एक बहीण आहे. मात्र सिमरन शाहनील गिलइतकी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसते.