Join us  

संजू सॅमसन काय खेळला...! १९ चेंडूंत चोपल्या ९० धावा; विक्रमी शतकासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:21 AM

Open in App
1 / 10

IPL 2021 : RR vs PBKS T20 Live Score Update : कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात प्रतिस्पर्धी फलंदाजांकडून झालेल्या वस्त्रहरणानंतर कमबॅक करणे सोपी गोष्ट नाही. पण, राजस्थान रॉयल्सचा नवनिर्वाचीत कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) यानं सोमवारी अविस्मरणीय खेळी केली.

2 / 10

पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) २२१ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) सलामीवीर बेन स्टोक्स भोपळ्यावर माघारी परतला. त्यानंतर टप्प्याटप्यानं विकेट्स पडतच होत्या. पण, कर्णधार सॅमसन एक बाजूनं खिंड लढवत होता. त्यानं जोस बटलर व शिवम दुबे यांना सोबत घेऊन, RRसाठी मजबूत पाया तयार केला.

3 / 10

रियान परागनं तुफानी खेळी करून संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावताना पंजाबच्या डगआऊटमध्ये टेंशनवालं वातावरण निर्माण केलं. जोस बटलर, शिवम दुबे आणि रियान पराग यांच्यासह संजूनं अनुक्रमे ४५ ( २६ चेंडू), ५३ ( ३३ चेंडू) आणि ५२ (२३ चेंडू) अशी भागीदारी केली.

4 / 10

संजू सॅमसननं आयपीएलमधील तिसरे शतक पूर्ण केले. त्यानं ५४ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह हे शतक पूर्ण केलं. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. १२ व ३५ धावांवर असताना संजूला जीवदान मिळाले होते.

5 / 10

RRला विजयासाठी अखेरच्या चार षटकांत ४८ धावांची गरज असताना लोकेश राहुलनं संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला पाचारण केलं. अखेरच्या ६ चेंडूंत १३ धावांची गरज होती अन् पहिल्या दोन चेंडूवर एकच धाव मिळाली. तिसऱ्या चेंडूवरही एकच धाव आली आणि तीन चेंडूंत ११ धावा अशी परिस्थिती निर्माण झाली.

6 / 10

संजूनं खणखणीत षटकार खेचून सामन्यातील चुरस कायम राखली. पाचव्या चेंडूवर संजूनं एक धाव न घेतल्यानं १ चेंडू ५ धावांची RRला गरज होती. संजूची अखेरच्या चेंडूवर विकेट पडली. संजू सॅमसन ६३ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकारांसह ११९ धावांवर माघारी परतला अन् पंजाबनं ४ धावांनी सामना जिंकला.

7 / 10

8 / 10

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून शतक करणारा तो सहावा फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, अॅडम गिलख्रिस्ट, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर आणि लोकेश राहुल यांनी अशी कामगिरी केली आहे.

9 / 10

आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक व्यर्थ जाण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी युसूफ पठाणनं २०१०मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडूंत ८ षटकार व ९ चौकारासह १०० धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे राजस्थान रॉयल्सनं तोही सामना चार धावांनी गमावला होता.

10 / 10

आयपीएलमध्ये सर्वाधिक ६ शतकांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानंतर विराट कोहली ( ५), शेन वॉटसन व डेव्हिड वॉर्नर ( प्रत्येकी ४) आणि एबी डिव्हिलियर्स व संजू सॅमसन ( प्रत्येकी ३) यांचा क्रमांक येतो.

टॅग्स :आयपीएल २०२१संजू सॅमसनराजस्थान रॉयल्सपंजाब किंग्स