सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. मात्र या जोडप्याने याच्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण घटस्फोटाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतरच सानिया आणि शोएब याची अधिकृत घोषणा करतील, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.
जगभरातील नामांकित लोकांनी दुबईच्या धरतीवर राहणे पसंद केले आहे. कारण ते शहरी जीवनशैली, ग्लिट्झ, ग्लॅमर आणि अर्थातच सुरक्षिततेने आकर्षित होतात. भारतातील सर्वात लोकप्रिय महिला स्पोर्ट्स सेलिब्रिटी आणि जगातील अव्वल टेनिसपटूंपैकी एक सानिया मिर्झा देखील त्यापैकी एक आहे.
सानिया मिर्झाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेट शोएब मलिकसोबत लग्न केले होते. या जोडप्याने लग्नाच्या 8 वर्षांनंतर ऑक्टोबर 2018 मध्ये इझहान मिर्झा मलिक या मुलाला जन्म दिला. आपल्या लग्नानंतर सानिया मिर्झाने दुबईत आपले दुसरे घर बसवले.
सानिया मिर्झाने कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ती दहा वर्षांहून अधिक काळापासून दुबईत राहत आहे. 'आम्ही 12 वर्षांपासून दुबईचे रहिवासी आहोत. आम्ही सगळे या गोष्टीशी सहमत आहोत की, जर तुम्ही दुबईत राहण्यास सुरूवात केली तर इतर ठिकाणी राहणे कठीण होते.'
टेनिस स्टारने हा देखील खुलासा केला की, ती या वर्षीच्या जुलैमध्ये तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक पहिले पाम झुमेराह येथील आलिशान घरात राहत होते. सानिया आणि शोएब यांच्या मुलाची शाळा तिथून जवळ असल्यामुळे ते द पाममध्ये राहतात.
या शानदार शहराबद्दल बोलताना सानियाने म्हटले, 'दुबई एक अशी जागा आहे जी सर्वांना आपलेसे करते. इथे सर्व काही पाहायला मिळते. याशिवाय हे ठिकाण आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी बहु-सांस्कृतिक स्थान आहे.'
सानिया मिर्झाच्या या आलिशान घरात शानदार बैठक व्यवस्था आहे. याशिवाय अप्रतिम भिंती, पडद्यांपासून ते विंटेज भिंतीच्या तुकड्यांपर्यंत, सर्व काही केवळ विलक्षण असल्याचे पाहायला मिळते.
सानिया मिर्झाच्या घरात गार्डन आणि स्विमिंग पूल आहे. सानियालाही तिच्या गार्डनचे विशेष आकर्षण आहे. ती अनेकदा गार्डनमधील तिचे फोटो शेअर करत असते. इझहानला खेळण्यासाठी या गार्डनमध्ये अनेक पाळणे देखील आहेत.
सानिया मिर्झाने 2001 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी चंडीगढमधील ITF कार्यक्रमातून सिनियर सर्किटमध्ये पदार्पण केले. एप्रिल 2003 मध्ये सानिया मिर्झाने तिन्ही एकेरी सामने जिंकून इंडिया फेड कप संघात पदार्पण केले. तिने 2003 विम्बल्डन चॅम्पियनशिप मुलींच्या दुहेरीचे विजेतेपद रशियाच्या एलिसा क्लेबानोवासोबत जिंकले.
2016 च्या टाईम्स मॅगझिनच्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सानिया मिर्झाला देखील स्थान देण्यात आले होते. ती 2004 अर्जुन पुरस्कार (भारतातील दुसरा सर्वोच्च क्रीडा सन्मान) प्राप्तकर्ता आहे. याशिवाय तिच्या नावावर जगातील मोठ्या क्रीडा स्पर्धामध्ये जिंकलेल्या 6 सुवर्ण पदकांसह एकूण 14 पदकांचा समावेश आहे.