विक्रमादित्य सचिन तेंडुलकरनं भारतीयांना क्रिकेटचे वेड लावले. आजही सचिन तेंडुलकरचा कोणत्याही सामन्याचे हायलाईट्स लागले की लोकं टिव्हीसमोर नक्की बसतात.
क्रिकेटची अनेक विक्रम पादाक्रांत करणाऱ्या तेंडुलकरनं कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केलं.
2011मध्ये सचिन तेंडुलकर पेरी क्रॉस रोड येथील बंगल्यात कुटुंबीयांसह राहायला गेला. 6000 स्क्वेअर फुटांचा हा बंगला वांद्रे पश्चिमेला आहे.
2007मध्ये त्यानं 39 कोटींत हा बंगला खरेदी केला होता.
2018मध्ये सचिननं त्याच्या पत्नीच्या नावानं BKC येथे आलिशान अपार्टमेंट बूक केलं. चला करूया घराची सफर
तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला येथे आलिशान घर बुक केले आहेत.
1600 स्क्वेअर फुटांचं हे घर पत्नी अंजलीच्या नावावर रजिस्टर आहे आणि त्याची किंमत 7.15 कोटी इतकी आहे.