अर्जुन तेंडुलकर हा मैदानातील कामगिरीसह वैयक्तिक आयुष्यातील खास गोष्टीमुळे चर्चेत असल्याचे दिसून येते.
सानिया चांडोक हिच्यासोबत साखरपुडा उरकल्यानंतर अर्जुन तेंडुलकरनं मैदानातील कामगिरीसह देखील सर्वांच लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.
अर्जुन तेंडुलकरनं बंगळुरु येथील तिम्मप्पेया मेमोरियल टूर्नामेंटमध्ये राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड याची विकेट घेत मैफील लुटली. या सामन्यात त्याने १७ षटकात ५० धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले.
आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं लेकासाठी शेअर केलेली खास पोस्ट चर्चेचा विषय ठरतीये. निमित्त आहे ते अर्जुन तेंडुलकरचा २६ वा वाढदिवस.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरन याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अर्जुन तेंडुलकरसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत सचिन तेंडुलकरनं लेकांसोबत समुद्र सफारीतील खास क्षण दिसून येतो.
दुसरा फोटो निवडताना सचिन तेंडुलकरनं अर्जुनचा बालपणीचा फोटो निवडत जुन्या आठवणीला उजाळा दिलाय.
फोटो शेअर करताना सचिन तेंडुलकरनं लिहिलंय की, तू आमचा मुलगा आहेस हे आमच्यासाठी खूप भाग्याचं वाटतं. तू एका विलक्षण व्यक्तिमत्वात घडताना पाहणं ही आमच्यासाठी मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला तुझा अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव नेहमी तुझ्यावर कृपादृष्टी ठेवो.'
सारा तेंडुलकर हिने देखील इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून खास फोटो शेअर करत अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.