Join us

तेंडुलकर ते रुट! कसोटीत सर्वाधिक शतक झळकवणारे आघाडीचे ५ फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 18:45 IST

Open in App
1 / 8

भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात जो रुटनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३७ व्या शतकाला गवसणी घातली.

2 / 8

टीम इंडियाविरुद्धच्या या शतकी खेळीसह जो रुटनं कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत एन्ट्री मारली आहे.

3 / 8

इथं एक नजर टाकुयात कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर

4 / 8

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. तेंडुलकरनं आपल्या कसोटी कारकिर्दीत २०० सामन्यातील ३२९ डावात ५१ शतके झळकवली आहेत. शतकांचे अर्धशतक झळकवणारा तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे.

5 / 8

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १६६ सान्यातील २८० डावात ४५ शतके झळकाली आहेत.

6 / 8

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग याने १६८ कसोटी सामन्यातील २८७ डावात ४१ शतके झळकावली आहेत.

7 / 8

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारानं १३४ कसोटी सामन्यातील २३३ डावात ३८ शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे.

8 / 8

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारानं १३४ कसोटी सामन्यातील २३३ डावात ३८ शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटसचिन तेंडुलकर