क्रिकेट जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर याची लेक अन् फिटनेस फ्रीक सारा तेंडुलकर हिने नुकताच नवा बिझनेस सुरु केलाय.
काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकरनं पिलेट्स स्टुडिओच्या माध्यमातून फिटनेस जगतात एन्ट्री मारल्याची गोष्ट सोशल मीडियावरुन शेअर केली होती.
त्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं लेक सारासाठी खास पोस्ट शेअर करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
सचिन तेंडुलकरनं फॅमलीसोबत लेकीच्या हस्ते पिलेट्स स्टुडिओच्या उद्घाटन क्षणाचा एक खास फोटो शेअर केलाय. ज्यात अर्जुन तेंडुलकर होणारी पत्नी आणि तेंडुलक घराण्याची सून सानिया चांडोक हिची झलकही पाहायला मिळते.
सचिनच्या खास पोस्टमधील स्टुडिओतील फोटोत अर्जुनची झलक दिसत नसली तरी सानिकाचं तेंडुलकर कुटुंबियातील बॉन्डिंग एकदम खास असल्याचे दिसून येते.
सचिन तेंडुलकरनं पोस्टमध्ये लिहिलंय की, आपल्या मुलांना जे आवडतं ते त्यांना मिळावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. आयुष्यात फिटनेस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सारा हा विचार आपल्या पद्धतीने पुढे नेत आहे, हा क्षण खूपच भावूक आहे. अशा आशयाच्या शब्दात सचिन तेंडुलकरनं आपल्या लेकीचं कौतुक केलं आहे.
सचिन तेंडुलकरनं स्टुडिओमधील पत्नी अंजलीसोबतचा एक फोटोही शेअर केलाय. या फ्रेममध्ये लेकीच्या यशस्वी प्रवासाचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसून येतोय.
सारा तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर या बाप-लेकींमध्ये कमालीचे बॉन्डिंग आहे. कमालीच्या फिटनेसच्या जोरावरच सचिनची कारकिर्द मोठी राहिली. सारा क्रीडा क्षेत्राशी कनेक्ट नसली तरी फिटनेसचा मंत्र ती जपते. या फोटोत तिच झलकं पाहायला मिळते.
फिटनेसशिवाय सारा तेंडुलकर भटकंतीचा छंद जोपासते. सोशल मीडियावरून यासंदर्भातील खास पोस्टही ती शेअर करत असते. ती लोकप्रिय स्टार कीड्सपैकी एक असून आता ती आपली आवड जपत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे.