Join us

Vinod Kambli vs Sachin Tendulkar : सचिनला सगळं माहित्येय, पण त्याच्याकडून मला आणखी काही नकोः विनोद कांबळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 17:22 IST

Open in App
1 / 5

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी ( Vinod Kambli) हा क्रिकेट संबंधित नोकरीच्या शोधात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( BCCI) त्याला ३० हजारांची पेन्शन मिळते आणि त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. कोरोना संकटाचा इतरांप्रमाणे कांबळीला फटका बसला. त्याला सचिन तेंडुलकरच्या नेरूळ येथील तेंडुलकर मिडलेसेक्स ग्लोबल अकादमीत ( Tendulkar Middlesex Global Academy ) नोकरी मिळाली होती, परंतु आता त्याला दररोज प्रवास करणे आता जमत नाही. त्यामुळेच तो आता नव्या नोकरीच्या शोधात आहे.

2 / 5

''मी पहाटे ५ वाजता उठतो आणि डी वाय पाटील स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी कॅब करतो. हा थकवणारा प्रवास आहे. त्यानंतर सायंकाळी मी BKC मैदानावर कोचिंग करतो,''असे कांबळीने Mid-Day ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तो पुढे म्हणाला,''मी निवृत्त क्रिकेटपटू आहे आणि पूर्णपणे BCCIच्या पेन्शनवर अवलंबून आहे. सध्याच्या घडीला हा एकमेव इन्कम सोर्स आहे. मी त्यासाठी BCCI चा आभारी आहे. त्यातून माझ्या घराचा उदरनिर्वाह होतोय. ''

3 / 5

''मला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मदतीची अपेक्षा आहे. मी Cricket Improvement Committeeमध्ये आहे, परंतु तो मानद जॉब आहे. मी MCAत मदतीची मागणी करण्यासाठी गेलो होतो. गरज असेल तेव्हा बोलवू, असे मला सांगण्यात आले. MCA अध्यक्ष डॉ. विजय पाटील किंवा सचिव संजय नाईक यांना मी विनंती करतो,''असेही कांबळी म्हणाला.

4 / 5

बालपणीचा मित्र व महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला या परिस्थितीबाबत माहिती आहे का?, असे विचारल्यावर कांबळी म्हणाला, सचिनला सर्वकाही माहित्येय, परंतु मला त्याच्याकडून आता आणखी काही नको. त्याने मला Tendulkar Middlesex Global Academyत नोकरी दिली. मी खूप आनंदी होतो. तो खूप चांगला मित्र राहिला आहे. तो माझ्यासाठी नेहमीच उभा राहिला आहे.

5 / 5

विनोद कांबळीने भारतासाठी १७ कसोटी व १०४ वन डे सामने खेळले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ शतकं व १७ अर्धशतकांसह ३५६५ धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमधील त्याची सरासरी ५९.४६ इतकी आहे.

टॅग्स :विनोद कांबळीसचिन तेंडुलकर
Open in App