२०१७ मध्ये एन्ट्री पण ३ वर्षे बसला बाकावर; आता IPL गाजवतोय मराठमोळा ऋतु'राज'

ruturaj gaikwad ipl : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. आयपीएल गाजवणाऱ्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा आयपीएलमधील प्रवास खडतर राहिला आहे.

ऋतुराजला २०१७ मध्ये रायजिंग सुपर जायंट्सने खरेदी केले. मात्र त्याला एक देखील सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तब्बल ३ वर्षे तो बाकावर बसला.

आता ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामात त्याने आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. याशिवाय सध्या ऑरेंज कॅप देखील मराठमोळ्या खेळाडूकडे आहे.

आयपीएल २०२३ मध्ये त्याने २ सामन्यांत १४९ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. खरं तर सलामीच्या सामन्यात तो गुजरातविरूद्ध केवळ ८ धावांनी शतकाला मुकला होता.

ऋतुराजला २०१७ मध्ये रायजिंग सुपर जायंट्सने खरेदी केले. पण तेव्हा त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी तब्बल ३ वर्षे वाट पाहिली.

तो २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा हिस्सा होता. पण २०२० मध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली.

ऋतुराज आजतागायत चेन्नईच्या संघाचा भाग आहे. चेन्नईच्या संघाने चौथ्यांदा आयपीएलचा किताब पटकावला त्या संघाचा तो भाग होता. आयपीएल २०२३ च्या लिलावापूर्वी सीएसकेने त्याला संघात कायम ठेवले होते.

ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३८ सामने खेळले असून १३५६ धावा केल्या आहेत. एक शतक आणि १२ अर्धशतकी खेळी करून ऋतुराजने भारतीय संघापर्यंत मजल मारली.

याशिवाय त्याच्या नावावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका षटकात ७ षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करतो. याशिवाय त्याने इंडिया ए, इंडिया बी आणि इंडिया ब्लू साठीही क्रिकेट खेळले आहे.

ऋतुराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून एक वन डे आणि ९ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.