Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्रिकेटपटूला अभिनेत्रीचा होकार मिळवण्यासाठी करावी लागली ११ महिन्यांची प्रतीक्षा!

By स्वदेश घाणेकर | Updated: February 17, 2021 10:18 IST

Open in App
1 / 11

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं फार जुनं नातं आहे. क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकार खेचणाऱ्या आणि आपल्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धींना नाचवणाऱ्या खेळाडूंनी प्रेमाच्या खेळपट्टीवरही दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंना क्लिन बोल्ड केले आहे. पण, भारताच्या एका क्रिकेटपटूला अभिनेत्रीचा होकार मिळवण्यासाठी तब्बल ११ महिने वाट पाहावी लागली.

2 / 11

ही लव्ह स्टोरी आहे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) आणि अभिनेत्री गीता बसरा ( Geeta Basra) यांची. व्हॅलेंटाईन्स डेला गीता बसरानं ही लव्ह स्टोरी सांगितली. गीतानं भज्जीला होकार देण्यासाठी ११ महिने वाट पाहायला लावली.

3 / 11

क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवणारा भज्जी पाहता क्षणीच गीताच्या प्रेमात पडला होता. तेव्हा गीता बॉलिवूडमध्ये आपला जम बसवत होती आणि भज्जी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज होता.

4 / 11

गीताला पाहताच भज्जी तिच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर हळुहळू प्रेमात झालं. गीता आपली पत्नी बनेल असा विश्वासही भज्जीला वाटत नव्हता. कारण, गीताला लग्नासाठी मनवणं सोपी गोष्ट नव्हती आणि भज्जीला त्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. ११ महिन्यानंतर गीतानं भज्जीचं प्रपोज स्वीकारलं.

5 / 11

एका मुलाखतीत भज्जीनं सांगितलं की,'' गीतावर एक गाणं 'अजनबी' चित्रीत झालं होतं आणि ते पाहून गीताच्या प्रेमात पडलो.'' त्यानंतर भज्जीला एका मित्राकडून गीताचा नंबर मिळाला आणि विलंब न लावता भज्जीनं तिला कॉफीसाठी विचारलं.

6 / 11

गीतानं भज्जीच्या त्या मॅसेजवर काहिच उत्तर दिलं नाही. या कालावधीत टीम इंडियानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला आणि तेव्हा गीतानं अभिनंदन करण्यासाठी भज्जीला मॅसेज केला. इथूनच दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली.

7 / 11

त्यानंतर गीतानं भज्जीकडे आयपीएलची तिकीटं मागितली आणि भज्जीनंही प्रेमासाठी तिकीटं मिळवून दिलीही. त्यानंतर गीतानं भज्जीला एक दिवस कॉफीसाठी विचारणा केली. भज्जी ही संधी कशी सोडणार होता आणि त्यानं लगेच होकार दिला.

8 / 11

हरभजन आणि गीता यांच्या मैत्रिची सुरुवात तर झाली होती, परंतु करिअरवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गीताला तेव्हा कोणत्याच नात्यात अडकायचं नव्हतं. गीताचे मित्रही भज्जीचे कौतुक करायचे आणि जवळपास ११ महिन्यानंतर गीतानं भज्जीला होकार दिला.

9 / 11

२०१५ साली गीता व भज्जीनं लग्नं केलं. त्यांना हिनाया नावाची मुलगी आहे.

10 / 11

11 / 11

टॅग्स :हरभजन सिंगभारतीय क्रिकेट संघ