रोहित आणि रितिका यांची एका जाहीरातींच्या शूटींगच्या वेळी ओळख झाली. 2008 साली रीबॉक या कंपनीच्या जाहीरातींच्यावेळी हे दोघे पहिल्यांदा भेटले.
रितिका ही भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची मानलेली बहिण आहे.
रितिका ही भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या कंपनीमध्ये कामाला होती. यादरम्यान या दोघांना डेटिंग करताना सर्वांनी पाहिले होते आणि त्यांचे फोटोही वायरल झाले होते.
रितिका ही सुरुवातीला रोहितची व्यवस्थापिका होती. त्यानंतर रोहित आणि रितिकाचे सूत जुळले आणि दोघांनी लग्न केले.
रितिकाच्या कुटुंबामध्ये आई-बाबा आणि भाऊ कृणाल आहेत.
रितिकाचे माहेर हे मुंबईतील वांद्रे येथील आहे.