Rohit Sharma Mumbai Indians Records, IPL 2022: आयपीएलचे सामने ४ मैदानांवर रंगणार, पाहा तिथे कसा आहे 'मुंबई इंडियन्स'चा रेकॉर्ड

IPL 2022 चे साखळी फेरीचे ७० सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याच्या मैदानांवर रंगणार.

Rohit Sharma Mumbai Indians Records : IPL 2022 बद्दल BCCI कडून शनिवारी काही ठळक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या. IPL 2022 मध्ये १० संघ असल्याने स्पर्धेचा नवा फॉरमॅट असणार आहे. ५-५ संघांचे दोन गट असतील. प्रत्येक संघ ५ संघांशी २-२ सामने तर ४ संघांशी १-१ सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्स यंदा अ गटात आहे.

यंदाचे IPL हे २६ मार्चला सुरू होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे साखळी फेरीचे सर्व ७० सामने हे केवळ ४ मैदानांवर होणार आहेत. मुंबईचे ब्रेबॉर्न व वानखेडे, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम आणि पुण्याजवळचे गहुंजे स्टेडियम इथे हे ७० सामने खेळले जाणार आहेत. पाहूया या ४ ठिकाणी कशी आहे मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची कामगिरी-

वानखेडे स्टेडियम (मुंबई) - ६७ सामने, ४२ विजय

ब्रेबॉर्न स्टेडियम (मुंबई) - ८ सामने, ६ विजय

डी वाय पाटील स्टेडियम (नेरूळ, नवी मुंबई) - ७ सामने, ५ विजय

MCA इंटरनॅशनल स्टेडियम (पुणे) - ५ सामने, ४ विजय