Join us  

Rohit Sharma Shikhar Dhawan: रोहित शर्माच्या एका विधानाने वाढवलं शिखर धवनचं टेन्शन, आता तर संधी मिळणं कठीणच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:39 AM

Open in App
1 / 6

Rohit Sharma Shikhar Dhawan, IND vs SL, 2nd ODI: भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवला. यासह भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. लोकेश राहुलने संयमी खेळ करत भारताचा विजय निश्चित केला. भारताने हा विजय वन डे क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्धी संघाविरोधात सर्वाधिक विजयाच्या ऑस्ट्रेलियाच्या (वि. न्यूझीलंड) वर्ल्ड रेकॉर्डशी वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली.

2 / 6

सामन्यात कुलदीप यादवने पुनरागमनाचा सामना गाजवला आणि मोहम्मद सिराजने त्याला साजेशी साथ दिली. कुलदीप व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. उम्रान मलिकने दोन विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव ३९.४ षटकांत २१५ धावांवर गुंडाळला. कुलदीप यादवने १० षटकांत ५१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी टिपले.

3 / 6

डावखुऱ्या कुलदीप यादवने गोलंदाजीत साऱ्यांची मनं जिंकली, पण रिषभ पंत आणि शिखर धवन यांना संघात स्थान नसल्याने पहिल्या ६ खेळाडूंमध्ये एकही डावखुरा फलंदाज भारताचा कडे नाही. तशातच, शिखर धवनला इतक्यात संधी मिळणंही कठीण आहे असं रोहित शर्माने सूचक विधान केले.

4 / 6

भारतीय संघात सध्या शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या असे सहा फलंदाज आहेत. पण संघात डावखुरा फलंदाज असावा असं वाटत नाही का? असा प्रश्न रोहितला सामना संपल्यानंतर विचारण्यात आला.

5 / 6

त्यावेळी रोहितने सूचक विधान केले आणि शिखर धवनला वन डे संघात स्थान मिळणे थोडं कठीणच असल्याचे स्पष्टपणे सुचविले. 'एखाद्या संघात उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाज समतोल असणे हे खूपच चांगले असते याची मला कल्पना आहे. पण आमच्यासाठी गेल्या वर्षभरात वरच्या फळीतील फलंदाजांनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे.'

6 / 6

'आम्हाला डावखुरा फलंदाज संघात असावा असं सध्यातरी वाटत नाही. कारण सध्या आमचा संघ समतोल आहे. आमच्या कडे सध्या असलेले उजव्या हाताचे फलंदाज ज्या पद्धतीची कामगिरी करतात त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यांनी दर्जेदार कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे आम्ही सध्या तरी फलंदाजीमध्ये बदल करण्याच्या विचारात अजिबात नाही,' असं रोहित शर्माने अतिशय स्पष्टपणेच सांगून टाकलं.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माशिखर धवनभारतीय क्रिकेट संघ
Open in App