इंग्लंडविरुद्धच्या कटक येथील वनडेत सेंच्युरी साजरी करण्याआधी रोहित शर्मानं वनडेत कॅप्टन्सीची 'फिफ्टी' साजरी केली. तो ५० व्या वनडेत संघाचं नेतृत्व करत होता. या खास सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटाही उचलला.
५० वनडेत कॅप्टन्सी करताना रोहित शर्माच्या नावे ३६ विजयाची नोंद आहे. ५० वनडेपर्यंत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.
५० वनडेत कॅप्टन्सी करताना सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम हा संयुक्तरित्या तिघांच्या नावे आहे. यात सर क्लाइव्ह लॉयड, रिकी पाँटिंग आणि विराट कोहलीचा नंबर लागतो.
कोहलीसह पाँटिंग आणि क्लाइव्ह लॉयड यांनी ५० वनडे सामन्यात संघाचे नेतृत्व करताना ३९ विजय मिळवल्याचा रेकॉर्ड आहे.
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हेन्सी क्रोनिए दुसऱ्या स्थानावर आहे. ५० वनडेत कॅप्टन्सी करताना त्याने ३७ वनडे मॅचेस जिंकल्या होत्या.
रोहित शर्मानं कटकमधील सामन्यात व्हिव्ह रिचर्ड्स या दिग्गजाची बरोबरी केलीये. या दोघांनी ५० वनडेत कॅप्टन्सी करताना आपापल्या संघांना ३६ वनडे मॅचेस जिंकून दिल्याचा रेकॉर्ड आहे.