Join us

ऑस्ट्रेलियन मैदानात रोहितचा हिट शो! विराटसह सचिनला जे जमलं नाही ते हिटमॅननं करून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:21 IST

Open in App
1 / 10

टी-२० पाठोपाठ कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर रोहित शर्मा फक्त एकदिवसीय प्रकारात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

2 / 10

क्रिकेटच्या या एकमेव प्रकारात तो आणखी किती काळ टिकणार? अशी चर्चा रंगत असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने मोठा धमाका केला आहे.ऑस्ट्रेलिया दौरा खास करताना त्याने अविस्मरणीय कामगिरी करून दाखवत इतिहास रचला आहे.

3 / 10

रोहित शर्मासाठी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची मालिका एकदम खास आहे. कदाचित त्याच्यासाठी हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरू शकतो.

4 / 10

रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत १००० धावांचा पल्ला गाठत आपला शेटवचा दौरा खास केल्याचे पाहायला मिळाले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

5 / 10

इथं एक नजर टाकुयात ऑस्ट्रेलियन मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच भारतीय फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर

6 / 10

रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ वनेत ५६.३६ च्या सरासरीसह ८९.३२ च्या सरासरीनं १०७१ धावा केल्या आहेत. यात ४ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद १७१ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

7 / 10

विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियन मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० सामन्यांत ८०२* धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४४.५५ इतकी असून त्याच्या भात्यातून ३ शतके आणि ४ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. ११७ ही विराट कोहलीची ऑस्ट्रेलिय मैदानातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडेतील सर्वोच्च खेळी आहे.

8 / 10

सचिन तेंडुलकरनं आपल्या वनडे कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन मैदानात २५ सामन्यांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३०.८३ असून, त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी ११७ धावांची आहे.

9 / 10

महेंद्र सिंह धोनीनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानात २१ सामन्यांत ४५.६० च्या सरासरीसह ५ अर्धशतकांच्या मदतीने ६८४ धावा केल्या आहेत. नाबाद ८७ ही धोनीची ऑस्ट्रेलियन मैदानातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.

10 / 10

टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीसचिन तेंडुलकरमहेंद्रसिंग धोनीशिखर धवन