Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित-रितिकाची LOVE STORY; हिटमॅननं गुडघ्यावर बसून केलेलं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 14:35 IST

Open in App
1 / 9

भारतीय संघाचा हिटमॅन अर्थात रोहित शर्मा याच्या लग्नाचा आज वाढदिवस.. रोहित अन् रितिका यांच्या लग्नाची गोष्ट एखाद्या चित्रपटासारखीच आहे

2 / 9

रितिका ही रोहितची मॅनेजर होती आणि या प्रोफेशनल नात्यातूनच हे प्रेम बहरलं. ही दोघं एकमेकांना सहा वर्षांपासून ओळखत होती. रितिका ही स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर होती आणि ती रोहितच्या सर्व मिटींग याची नोंद ठेवायची

3 / 9

रितिका ही युवराज सिंगची मानलेली बहीण... रोहित व रितिका कामाच्या निमित्तानं अनेकदा बेटायचे. त्यानंतर त्यांच्या चांगल्या मैत्रीत रुपांतर झाले आणि हळूहळू दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

4 / 9

सहा वर्षांच्या प्रेमसंबंधांना त्यांनी लग्नाच्या नात्यात बांधण्याचा निर्णय घेतला. रोहितनं आपल्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या निर्णयाचा क्षण अविस्मरणीय करण्याचा ठरवले.

5 / 9

बोरीवली स्पोर्ट्स क्लब येथून रोहितनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. तेथेच त्यानं गुडघ्यावर बसून हातात रिंग घेत रितिकाला लग्नाची मागणी घातली. रितिकानंही त्याला होकार दिला.

6 / 9

रोहितनं ट्विटरवरून त्याच्या साखरपुड्याची बातमी सर्वांना सांगितली. 3 जून 2015मध्ये दोघांनी साखरपुडा केला.

7 / 9

13 डिसेंबर 2015मध्ये दोघांनी विवाह केला. मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला क्रिकेटपटू बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योगपती उपस्थित होते.

8 / 9

मुंबई इंडियन्सचे मालक अंबानी यांनी या दोघांच्या विवाहाची ग्रँड पार्टी दिली होती. त्यात देशातील मोठमोठी व्यक्ती हजर होत्या.

9 / 9

या दोघांच्या लग्नाला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता त्यांच्या कुटुंबात समायरा ही गोड मुलगीही आली आहे.

टॅग्स :रोहित शर्मा