हिटमॅन रोहितसाठी रितिकाची खास पोस्ट; बर्थडे पार्टीतील प्रेमाची मिठीही चर्चेत; पाहा फोटो

रोहित शर्माच्या बर्थडे दिवशी रितिकाने शेअर केली खास पोस्ट

रोहित शर्मा आणि रितिका ही लोकप्रिय सेलिब्रेटी जोडी आहे. स्पोर्ट्स मॅनेजर ते रोहितची पत्नी या प्रवासातील अनेक क्षण रितिका आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करताना दिसते.

रोहितच्या ३८ व्या बर्थडेच्या शुभेच्छा देताना रितिकाने काही खास फोटो शेअर केले आहेत. To Our Ro या कॅप्शनसह शेअर केलेल्या पहिल्या फोटोत रितिका आपल्या लेकाला मांडिवर घेऊन रोहितच्या पाठिला पाठ लावून बसल्याचे दिसते.

दुसऱ्या फोटमध्ये रितिकाने समायरा आणि रोहित या बाप-लेकीमधील खास फ्रेम अन् दोघांच्यातील प्रेम दाखवणारा क्युट फोटो शेअर केला आहे.

रितिकाने शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोमध्ये रोहितसह समायराही दिसते. या फोटोतील तिघांचा अंदाज एकदम खास आहे.

रितिकाच्या पोस्टशिवाय मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनही रोहित शर्माच्या बर्थे सेलिब्रेशनचा खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

MI च्या बर्थे पाटीत रितिकाचीही झलक पाहायला मिळते. केक भरवण्यासह ती रोहितला प्रेमाची मिठी मारताना पाहायला मिळते. हा फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

रोहित आणि रितिका यांची प्रेमकहाणी खूपच खास आहे. रितिका आधी स्पोर्ट्स मॅनेजरच्या रुपात काम करायची. एका जाहिरातीच्या निमित्ताने रोहित तिला भेटला अन् दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली.

ज्या मैदानातून क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्याच बोरिवलीच्या स्पोर्ट्स क्बलमध्ये रोहितनं रितिकाला प्रपोज केले होते. जून २०१५ मध्ये ही जोडी लग्नंबंधानत अडकली.

रोहित-रितिकाच्या लग्नाला जवळपास दहा वर्षें झाली जोडीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. दोघेही खास फ्रेमसह एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी चुकवत नाहीत.