Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rishabh Pant च्या महागड्या शॉपिंगसह LSG नं या ४ भारतीय खेळाडूंवर खेळला कोट्यवधींचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 10:26 IST

Open in App
1 / 9

IPL मेगा लिलावात LSG च्या संघाने आतापर्यंतच्या इतिहासातील विक्रमी बोली लावली. रिषभ पंतवर त्यांनी २७ कोटी रुपयांचा डाव खेळला. यासह अन्य खेळाडूही आहेत ज्यांच्यावर या संघानं पाण्यासारखा पैसा ओतला. एक नजर पंतशिवाय महागड्या खेळाडूंसह या संघानं आगामी हंगामासाठी केलेल्या संघ बांधणीवर

2 / 9

मेगा लिलावात तब्बल ११९ कोटी ९० लाख खर्च करणाऱ्या लखनऊ संघानं रिषभ पंतवर विक्रमी २७ कोटींची बोली लागली. तो या संघाचाच नव्हे तर आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

3 / 9

LSG संघातील दुसरा महागडा खेळाडूही भारतीयच आहे. आवेश खानसाठी त्यांनी ९ कोटी ७५ लाख रुपये मोजल्याचे पाहायला मिळाले.

4 / 9

भारतीय जलदगती गोलंदाज आकाश दीपही LSG च्या महागड्या शॉपिंगमधील टॉप ३ मधील खेळाडू आहे. त्याच्यासाठी संघाने ८ कोटी खर्च केले आहेत.

5 / 9

परदेशी खेळाडूंमध्ये या संघानं दक्षिण आफ्रिकेच्या किलर मिलरवर मोठा डाव खेळला. या खेळाडूसाठी संघाने ७ कोटी ५० लाख रुपये मोजले.

6 / 9

लखनौच्या संघाने अब्दुल समदसाठीही ४ कोटी २० लाख रुपये मोजले आहेत.

7 / 9

दक्षिण आफ्रिकेच्या मार्करमला लखनौ फ्रँचायझी संघाने २ कोटी या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात घेतले.

8 / 9

9 / 9

असा आहे पंतचा नवा LSG संघ

टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल लिलावरिषभ पंतलखनौ सुपर जायंट्स