क्रिकेटच्या विरोधात होते बाबा… 'त्या' एका गोष्टीनं मन बदललं आणि तेच बनले रिंकूच्या स्वप्नांचा आधारस्तंभ!

रिंकूच्या बाबांना तो क्रिकेट खेळू नये असे वाटायचे, पण...

IPL मधून स्टारडम मिळून भारतीय संघाच्या फिनिशरच्या रुपात नावारुपाला आलेला क्रिकेटर रिंकू सिंह याचा मोठा आधारस्तभ हरपला. क्रिकेटरचे वडील खानचंद्र सिंह यांचे यकृताच्या कर्करोगाने निधन झाले.

कुटुंबियासोबत १० बाय १० च्या खोली ३५ वर्षे काढणाऱ्या खानचंद्र सिंह यांनी खांद्यावरुन सिलेंडर घरोघरी पोहचवून लेकाचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम केलं. रिंकूच्या यशात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. क्रिकेटरच्या आयुष्यात त्याचे वडील हेच त्याचे खरे हिरो आहेत.

पण फार कमी लोकांना माहिती असेल की, रिंकूला क्रिकेट करण्यासाठी काबाड कष्ट करणाऱ्या या बापमाणसाला रिंकू सिंह याने क्रिकेटकडे वळावे, असे अजिबात वाटत नव्हते. सुरुवातीच्या काळात त्यांचा क्रिकेटला विरोध होता. इथू जाणून घेऊयात त्यामागचं कारण आणि असं काय घडलं ज्यामुळे रिंकूच्या वडिलांनी त्याला खंबीर साथ दिली अन् तो मोठा क्रिकेटर झाला यासंदर्भातील खास गोष्ट

रिंकू सिंहच्या घरची परिस्थिती हालाकीची होती. वडील कंधी खांद्यावरून तर कधी सायकलवरुन घरोघरी गॅस सिलेंडर पोहचवण्याचे काम करायचे. आपल्या मुलावरही आपल्यासारखेच काम करण्याची वेळ येऊ नये असे त्यांना वाटायचे. त्यामुळे क्रिकेटचा नाद सोडून रिंकून अभ्यासावर अधिक भर द्यावा, असे त्यांचे मत होते.

रिंकू सिंहन बालपणी क्रिकेट खेळण्यासाठी वडिलांचा मारही खाल्ला आहे. पण एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे बापाचा लेकावरील भरवसा वाढला. विरोध मावळला अन् बापमाणूस लेकाला क्रिकेट करण्यासाठी आधारस्तंभ झाला.

रिंकू सिंह याने शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत बाईक जिंकली होती. ही बाईक त्याने वडिलांना गिफ्ट केली. दररोजचे कष्ट कमी करण्यासाठी लेकाने दिलेले गिफ्ट बापाची काळजी दाखवणारे तर होतेत. पण लेकाची क्रिकेटमधील क्षमताही सिद्ध करणारे होते. इथंच रिंकूच्या वडिलांचे मन बदलले.

रिंकूनही बापमाणसानं दाखवलेला विश्वास, त्याग आणि कष्टाचं चीज केलं. २०१७ मध्ये IPL मधील पंजाब किंग्जच्या संघाने रिंकूवर १० लाखांची बोली लावली. या पैशातून रिंकून वडिलांवरील सर्व कर्ज फेडले.

२०१८ च्या हंगामात रिंकू सिंहसाठी शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने ८० कोटी मोजले होते. त्यानंतर रिंकून घर खरेदी केले. रिंकू सिंह आणि त्याचे वडील यांच्यात खास बॉन्डिंग होते. IPL मध्ये धमाकेदार कामगिरीनंतर लेकाला मोठा पैसा मिळाल्यावरही त्याचे वडिल आपले पूर्वीचे काम त्याच जोमात करत होते. त्यांची ही गोष्ट खूप काही सांगून जाणारी आहे.