Join us  

IPL 2022 Retention Live Updates : Mega Auction 2022 साठी पंजाब किंग्सनं वाचवलं सर्वाधिक धन, जाणून घ्या कोणाच्या बटव्यात किती रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 11:30 PM

Open in App
1 / 11

Indian Premier League 2022 Retention Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वासाठी 8 फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन ( कायम राखलेल्या) खेळाडूंची यादी जाहीर केली. लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, डेव्हिड वॉर्नर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, राशिद खान, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो ही काही मोठी नावं रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीतून गायब झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे IPL 2022 Mega Auction मध्ये यापैकी कुणीतरी मोठी रक्कम पटकावेल यात शंका नाही. पण, या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 8 फ्रँचायझींकडे तेवढे पैसे शिल्लक राहिलेत का?

2 / 11

पंजाब किंग्सनं फक्त दोनच खेळाडूंना कायम राखले, तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी प्रत्येकी तीन आणि चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी प्रत्येकी चार खेळाडूंना कायम राखले आहे. आज एकूण 27 खेळाडूंना कायम राखले गेले आणि त्यात रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, रिषभ पंत हे प्रत्येकी 16 कोटींची किंमत घेऊन सर्वात महागडे खेळाडू ठरले.

3 / 11

बीसीसीआयनं प्रत्येकी फ्रँचायझीला ९० कोटींची पर्स दिली आहे आणि त्यातच त्यांना संघबांधणी करायची आहे. रिटेन केलेल्या खेळाडूंची रक्कम यातून वजा केली जाणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक राहिली ( Remaining purse of IPL teams ahead of Mega Auction)

4 / 11

पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( 14 कोटी), अर्षदीप सिंग ( 4 कोटी) ; शिल्लक रक्कम - 72 कोटी

5 / 11

सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( 14 कोटी), अब्दुल समद ( 4 कोटी), उम्रान मलिक ( 4 कोटी); शिल्लक रक्कम - 68 कोटी

6 / 11

राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( 14 कोटी), जोस बटलर ( 10 कोटी), यशस्वी जैस्वाल ( 4 कोटी); शिल्लक रक्कम - 62 कोटी

7 / 11

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी); शिल्लक रक्कम - 57 कोटी

8 / 11

चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी); शिल्लक रक्कम - 48 कोटी

9 / 11

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 14 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी); शिल्लक रक्कम - 48 कोटी

10 / 11

कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( 12 कोटी), वरुण चक्रवर्थी ( 8 कोटी), वेंकटेश अय्यर ( 8 कोटी) , सुनील नरीन ( 6 कोटी); शिल्लक रक्कम - 48 कोटी

11 / 11

दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( 16 कोटी), अक्षर पटेल ( 12 कोटी), पृथ्वी शॉ ( 8 कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( 6 कोटी); शिल्लक रक्कम - 47 कोटी

टॅग्स :आयपीएल २०२१पंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App