Join us  

Pre Wedding Shoot: लाल ड्रेस हातात बॅट, महिला क्रिकेटपटूने शेअर केले प्री-वेडिंगचे जबरदस्त फोटो, फॅन्स म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:35 PM

Open in App
1 / 5

पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू कायनात इम्तियाज हिची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. कायनात इम्तियाज हिने एक प्री-वेडिंग फोटोशूट केले होते. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5

२९ वर्षांची पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू कायनात इम्तियाज ही तिच्या सौंदर्यामुळे खूप चर्चेत राहते. कायनात इम्तियाज नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.

3 / 5

सोमवारी कायनात इम्तियाज हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे फोटो शेअर केले होते ज्यांना पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल. कायनात इम्तियाज हिने लाल ड्रेसमध्ये बॅट घेऊन जबरदस्त प्री-वेडिंग फोटोशूट केलं होतं.

4 / 5

या फोटोंमध्ये कायनात इम्तियाज सुंदर दिसत आहे. कायनातने मोहम्मद वकार उद्दीन याच्यासोबत विवाह केला आहे. कायनातचा विवाह ३० मार्च रोजी झाला होता. मात्र आता त्याने आपले फोटो शेअर केले आहेत.

5 / 5

कायनात इम्तियाजने पाकिस्तानसाठी १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्यामध्ये ६.१५ च्या इकॉनॉमी रेटने ९ विकेट्स टिपले आहेत. तसेच तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२४ धावाही जमवल्या आहेत. कायनातने १५ टी-२० सामन्यांमध्ये ९ विकेट्स आणि १२० धावा जमवल्या आहेत.

टॅग्स :पाकिस्तानआंतरराष्ट्रीय क्रिकेटलग्न
Open in App