Join us  

Record Break : CSK वर 'सुदर्शन'चक्र! शुबमन गिल, वृद्धीमान साहा, साई यांनी नोंदवले मोठे विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 9:30 PM

Open in App
1 / 6

शुबमन गिलने यंदाच्या पर्वात १७ सामन्यांत ५९.३३ च्या सरासरीने आणि १५७.८०च्या स्ट्राईक रेटने ८९० धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकं व ३ अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या पर्वात त्याने सर्वाधिक ८५ चौकार खेचले आहेत, तर ३३ षटकार त्याच्या नावावर आहेत. क्वालिफायर २ मधील ६० चेंडूंत १२९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.

2 / 6

शुबमनला आयपीएलमध्ये इतिहास घडवण्याची संधी होती. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक ९७३ धावांचा विक्रम विराट कोहलीने ( २०१६) केला होता, आज शुबमनने शतकी खेळी करून हा विक्रम तोडला असता, परंतु त्याला आयपीएल २०२३ मध्ये ८९० धावांवर समाधान मानावे लागले. त्याने जॉस बटलरचा ८६३ धावांचा ( २०२२) विक्रम मोडला.

3 / 6

आयपीएल २०२३ मध्ये ऑरेंज कॅपचा मान शुबमन गिलने पटकावला अन् तो आयपीएल इतिहासत Orange Cap जिंकणारा युवा फलंदाज ठरला. त्याने २३ वर्ष व २६३ दिवसांचा असताना ही कॅप जिंकली आणि ऋतुराज गायकवाडचा ( २४ वर्ष व २५८ दिवस) विक्रम मोडला. ऋतुराजने २०२१मध्ये ६३५ धावा केल्या होत्या. त्याआधी शॉन मार्शने ( किंग्स इलेव्हन पंजाबसाठी) २४ वर्ष व ३२८ दिवसांचा असताना ऑरेंज कॅप जिंकली होती.

4 / 6

वृद्धीमान साहा ३९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावांवर बाद झाला. आयपीएल फायनलमध्ये दोन वेळा ५०+ धावा करणारा साहा पहिलाच यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. त्याने २०१४मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून KKRविरुद्ध नाबाद ११५ धावा केल्या होत्या.

5 / 6

आयपीएल फायनलमध्ये ५०+ धावा करणाऱ्या साई सुदर्शन ( २१ वर्ष व २२६ दिवस) हा दुसरा युवा फलंदाज ठरला. मनन वोहरा ( २० वर्ष व ३१८ दिवस) या विक्रमात अव्वल स्थानी आहे. त्याने २०१४ मध्ये KKRविरुद्ध हा पराक्रम केला होता. साई सुदर्शनने शुबमन गिलला ( २२ वर्ष व ३७ दिवस, २०२१ वि. CSK) व रिषभ पंत ( २३ वर्ष व ३७ दिवस, २०२० वि. MI) यांना मागे टाकले.

6 / 6

साई सुदर्शनने ९६ धावा करताना आयपीएल फायनलमध्ये अनकॅप्ड खेळाडूकडून सर्वोत्तम धावसंख्या उभारली. यापूर्वी २०१४ मध्ये मनिष पांडेने ९४, २०१२मध्ये मनवींदर बिस्लाने ८९ आणि २०१४ मध्ये मनन वोहराने ६७ धावा केल्या होत्या.

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्सशुभमन गिलवृद्धिमान साहाचेन्नई सुपर किंग्स
Open in App