कपिल देव यांची भूमिका साकारणार रणवीर सिंग

मेरी कोमपासून सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक खेळाडूंच्या जीवनावर आधारित सिनेमे अलिकडच्या काळात आले आहेत.

'१९८३ च्या वर्ल्ड कप' वर देखील एक सिनेमा बनतोय. यात कपिल देवची भूमिका साकारणार आहे अभिनेता रणवीर सिंग.

रणवीर पहिल्यांदाच प्रेक्षकांना एका क्रिकेटरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कपिल देव यांच्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेक अभिनेत्यांची नावे चर्चेत होती. त्यामुळे या सगळ्या अभिनेत्यांमध्ये कोणता अभिनेता बाजी मारणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती.

भारताचा माजी कर्णधार कपिल देव याच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ ला पहिला विश्वचषक जिंकला होता. त्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देवने उंचावलेल्या विश्वचषकाची नोंद भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी झाली.

या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान करत आहे. कबीर खान आणि रणवीर या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र येत आहेत.

सध्या रणवीर संजय लीला भन्साळीच्या 'पद्मावती' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यात तो अल्लाउद्दिन खिलजीची भूमिका साकारत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार कपिल देवने उंचावलेल्या विश्वचषकाची नोंद भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी झाली आहे.