Raksha Bandhan 2025: भारतीय क्रिकेटर्स अन् त्यांचे बहिणीसोबतचे खास बॉन्डिंग; इथं पाहा खास फोटो

शुबमन गिल, श्रेसय अय्यर आणि अभिषेक शर्मासह दीपक चाहरची बहिण सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचे दिसून येते.

श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा ही देखील सोशल मीडियावरील सक्रीय अन् लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. भावाला चीअर करण्यापासून ते त्याच्या खेळीला दाद देण्यापर्यंतच्या तिच्या खास पोस्ट चर्चेचा विषय ठरत असतात.

शुबमन गिल आणि शाहनील गिल ही भावा बहिणीची जोडीही सोशल मीडयावरून अनेकदा खास फोटो शेअर करताना दिसते.

सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकरचा फोटो पाहिल्यावर, वेड्या बहिणीची वेडी ही माया....हे गाणंच आठवते.

दीपक चाहर अन् मालती चाहर ही बहिण भावाची जोडीही चांगलीच लोकप्रिय आहे. मालतीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन बालपणीच्या फोटोसह सध्याचा फोटो शेअर केला आहे. दोन्ही फोटोतून या भावा बहिणीतील बॉन्डिंग दिसून येते.

मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याने आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केलेला बहिण अपूर्वासोबतचा फोटोही एकदम खासच आहे.

जसप्रीत बुमराहच्या बहिणीचे नाव जुहिका बुमराह असं आहे. दोघांचे सोशल मीडियावर फारसे फोटो उपलब्ध नाहीत. पण हा फोटो दोघांमधील खास बॉन्डिंग दाखवून देण्यास पुरेसा ठरेल, असाच आहे.

केएल राहुलच्या बहिणीचे नाव भावना असं आहे. या दोन फोटोमधून तुम्हाला दोन्ही भावंडातील प्रेमाची खास झलक दिसून येईल.

भारताचा युवा क्रिकेटर अभिषेक शर्माची बहिण कोमल शर्मा ही पेशाने डॉक्टर आहे. ती सातत्याने आपल्या भावाला चीअर करण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावताना पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत ही भावा बहिणीची जोडी आपल्यातील खास बॉन्डिंग दाखवून देताना दिसते.