Join us  

Ind Vs Pak T20 World Cup: टीम इंडिया देणार पाकिस्तानला झटका! द्रविडने रोहित-कोहलीसोबत आखली मोठी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 4:03 PM

Open in App
1 / 5

उद्याचा दिवस टीम इंडियासाठी महत्वाचा आहे.उद्या रविवारी टीम इंडिया आणि टीम पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक 2022 चा सुपर-12 सामना होणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. टीम इंडियाने या सामन्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

2 / 5

टीम इंडियाचे तयारीचे काही फोटो बीबीसीआयने शेअर केले आहेत.यात टीम इंडियाचे खेळाडू जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहेत. या अजून एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, यात टीम इंडियाची कोअर टीम एकत्र चर्चा करताना दिसत आहे.

3 / 5

टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रवीड, कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि कोच विक्रम राठोड मैदानात रणनीती आखत असल्याचे दिसत आहे. टीम इंडियाची ही कोअर टीम आहे. आता यांची रमनीती पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात उपयोगी पडणार का हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे.

4 / 5

बीसीसीआयने नुकतेच हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत हार्दिक पंड्या,युजवेंद्र चहल यांच्यासह अन्य खेळाडू सराव करत असल्याचे दिसत आहे. आज कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत खेळाडू सामन्यासाठी फिट असल्याची माहिती दिली आहे.

5 / 5

पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाचा प्लेइंग-11 अजुनही जाहीर केलेला नाही.टीम इंडिया दिनेश कार्तिकसह मैदानात उतरू शकतो तर या सामन्यात ऋषभ पंतला प्लेइंग-11 मधून बाहेर बसावे लागू शकते, असं बोलले जात आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपाकिस्तानरोहित शर्माविराट कोहली
Open in App