Join us  

Rahul Dravid on Wriddhiman Saha: वृद्धिमान साहाच्या टीकेवर राहुल द्रविड मनमोकळेपणाने बोलला; त्यामागचा हेतू समजल्यावर 'The Wall'प्रती आदर आणखी वाढला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 12:18 AM

Open in App
1 / 8

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मान दुखत असतानाही केलेल्या खेळीचं कौतुक गांगुलीनं केलं होतं, परंतु त्याच्या कौतुकावेळी असलेलं विधान अन् परिस्थिती ही परस्पर विरोधी झाली. द्रविडनेही अप्रत्यक्षरित्या निवृत्तीचे संकेत दिले, असे साहाने म्हटले होते. त्याच्या या विधानावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मौन सोडले.

2 / 8

''न्यूझीलंडविरुद्ध मी मानेच्या दुखापतीसह खेळलो होतो आणि आम्ही विजयाच्या नजीक पोहोचलोच होतो. तेव्हा दादा ( गांगुली) मला म्हणाला होता, की जोपर्यंत मी इथे आहे, तोपर्यंत तुला चिंता करण्याची गरज नाही. पण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चित्र परस्पर विरोधी दिसले. मला धक्काच बसला. एका कसोटी मालिकेनंतर असे काय घडले, हेच मला कळेनासे झाले. माझं वाढतं वय कारणीभूत आहे की काही?, दादा काही वेगळंच म्हणाला होता आणि प्रत्यक्षात त्याच्या विरुद्ध सगळे घडले. त्यामुळेच मला अधिक धक्का बसला,''असे वृद्धिमान साहाने सांगितले.

3 / 8

तो पुढे म्हणाला,''आता संघ जाहीर झालाच आहे, तर मी संघ निवडीत काय झाले याचा खुलासा करतो. राहुल द्रविड यानेही मला संकेत दिले होते, की तुला संघातून वगळण्याची चर्चा सुरू आहे. त्याने अप्रत्यक्षरित्या मला निर्णय घेण्यास सांगितले.''

4 / 8

भारताने ट्वेंटी-२० मालिकेतही वेस्ट इंडिजला ३-० असे लोळवल्यानंतर राहुल द्रविड पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेला आणि त्याच्यासमोर पहिला प्रश्न हा वृद्धिमान साहाचाच विचारण्यात आला.

5 / 8

त्यावर द्रविड म्हणाला, त्याच्या विधानाने माझ्या भावना अजिबात दुखावलेल्या नाही. वृद्धिमान साहाप्रती माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि त्याचे भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या योगदानाचाही मी आदर करतो. त्याच आदरातून मी त्याच्याशी बोललो. त्याच्या वाटचालीबद्दल त्याला स्पष्ट माहित असावे, हे मला वाटले. मीडियाकडून त्याला या गोष्टी कळता कामा नये, हा त्यामागचा हेतू होता.''

6 / 8

''खेळाडूंनी माझ्या प्रत्येक मताशी सहमत असावं असं मला अजिबात वाटत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही लपवाछपवी करावी. अशा प्रकारचे संभाषण व्हायला हवेत, असे मला वाटते. त्यामुळे मला दुःख अजिबात झालेले नाही. खेळाडू दुःखी होणे हे नैसर्गिक आहे,''असेही तो म्हणाला.

7 / 8

तो पुढे म्हणाला,''वृद्धिमानप्रती असलेल्या आदरामुळेच मी त्याला स्पष्ट सांगितले. रिषभ पंत युवा यष्टिरक्षक म्हणून समोर आला आहे आणि तो पहिली पसंती आहे. युवा यष्टिरक्षकांना घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे वृद्धिमान साहा जे बोलला त्यानंतर त्याच्याप्रती असलेला आदर किंचितही कमी होणार नाही.''

8 / 8

टॅग्स :राहुल द्रविडवृद्धिमान साहाभारत विरुद्ध श्रीलंकाबीसीसीआय
Open in App