दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर दमदार खेळ करताना पंजाब किंग्जला १५ धावांनी नमवले. या विजयासह दिल्लीने पंजाबची वाटचाल अत्यंत बिकट केली असून त्यांनाही जवळपास स्पर्धेबाहेर केले आहे. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दिल्लीने २० षटकांत २ बाद २१३ धावा फटकावल्या. यानंतर त्यांनी पंजाबला २० षटकांत ८ बाद १९८ धावांवर रोखले.
यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर दिल्लीने आक्रमक खेळ करत पंजाब किंग्जचे गणित बिघडविले. दिल्लीने पृथ्वी शॉ आणि राइली रोस्सो यांच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर द्विशतक झळकावले. सुरुवातीच्या सामन्यांत सातत्याने अपयशी ठरल्याने संघाबाहेर गेलेल्या पृथ्वीने कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह ६२ चेंडूंत ९४ धावांची सलामी दिली.
पृथ्वी पहिल्या सहा डावांमध्ये केवळ ४७ धावा करू शकला होता. मात्र पंजाबविरुद्ध पृथ्वी शॉने ३८ चेंडूमध्ये १४२.११ च्या स्ट्राइक रेटने ५४ धावा केल्या. यावेळी त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला.
पृथ्वी शॉच्या या खेळीची चर्चा तर रंगलीय मात्र आणि एका गोष्टीची जास्त चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसून येत आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी पृथ्वी शॉला सपोर्ट करण्यासाठी एक विशेष व्यक्ती मैदानात हजर होती. तीच आहे आहे निधी तापडिया.
पृथ्वी शॉ आणि निधी तापडिया एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत होत्या. पण आता ते पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत.
पृथ्वीच्या या खेळीनंतर निधी तापाडियाने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत कौतुक केले आहे.
निधी तापडिया एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात.
निधी तापडियाचे इंस्टाग्रामवर 108K फॉलोअर्स आहेत. ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे.
नवीन वर्षाची पार्टी करण्यासाठी पृथ्वी शॉ एका पबमध्ये गेला होता. या पार्टीत निधी तापडिया देखील त्याच्यासोबत दिसली होती. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.