Join us

शिखरचे शतक, भारताचा लंकेवर दणदणीत विजय; मालिकाही खिशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 21:02 IST

Open in App
1 / 8

टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव करत एकदिवसीय मालिकेवर आपले नाव कोरले. (फोटो सोर्स - बीसीसीआय)

2 / 8

प्रथम फलंदाजी करताना उपुल थरंगाच्या 95 धावांच्या बळावर श्रीलंकेनं 44 षटकांत सर्वबाद 215 धावांपर्यंत मजल मारली. थरंगानं 95 (82) धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं तीन षटकार आणि 12 चौकार लगावले.

3 / 8

एकवेळ श्रीलंका 300 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत असताना भारतीय फिरकीच्या जाळ्यात लंकेचे फलंदाज अडकले. भारताकडून चहल आणि कुलदिपने प्रत्येकी तीन बळी घेतले

4 / 8

28 व्या षटकात कुलदिप यादवनं थरंगाचा अडथळा दूर केला. कुलदिपच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्यासाठी ख्रिस सोडून बाहेर जाणाऱ्या थरंगाला महेंद्रसिंग धोनीच्या चपळ यष्टीरक्षणामुळे 95 धावांवर बाद व्हाव लागलं. थरंगानंतर त्याच षटकात कुलदिपनं निरोशन डिकवेला 8 धावांवर बाद करत सामन्यात भारताची बाजू मजबूत केली

5 / 8

लागोपाठ दोन सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकणाऱ्या अय्यरने 63 चेंडूंमध्ये 65 धावा केल्या. यात 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे

6 / 8

शिखरने 85 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले 12 वे वनडे शतक केले. आपल्या शतकी खेळीत त्याने 4000 वनडे धावांचा पल्ला देखील गाठला.

7 / 8

श्रेयस अय्यर आणि शिखरनं दुसऱ्या विकेटसाठी 135 धावांची निर्णायक भागीदारी केली. भारताची धावसंख्या 149 असताना श्रेयस बाद झाला.

8 / 8

पाहुण्या संघाने प्रथम फलंदाजी करत 215 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करत भारताने केवळ 2 गडी गमावत आपले लक्ष्य गाठले. आता या दोन संघांदरम्यान टी-20 मालिकेतील पहिला सामना 20 डिसेंबरला कटक येथे खेळवला जाणार आहे.

टॅग्स :क्रिकेटबीसीसीआयश्रीलंकारोहित शर्माशिखर धवन