Join us  

भाऊ कृणाल पांड्याच्या लग्नात हार्दिकने अशी उडवली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 12:08 PM

Open in App
1 / 8

कृणाल पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड पंखुडी शर्माचे लग्न मुंबईतील जुहुमधल्या जेडब्ल्यु मेरिएट हॉटेलमध्ये झाले. या लग्नात अनेक क्रिकेटर्ससह इतर सेलिब्रिटीही दिसून आले.

2 / 8

भाऊ कृणाल पांड्याच्या लग्नात हार्दिक पांड्या एकदम उत्साहात दिसत होता. मुळ खट्याळ आणि मस्तीखोर स्वभावात त्याचा लग्नमंडपातला दंगा चालुच होता. लग्नवरात आणताना हार्दिकने कृणालला बुलेटवरुन आणले.

3 / 8

अमिताभ बच्चन, रोहीत शर्मा, पार्थिव पटेल, लोकेश राहुल आणि जयदेव उनाडकट हेसुध्दा आले होते.

4 / 8

सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, युजवेंद्र चहल हेसुध्दा कृणालच्या लग्नसोहळ्यात दिसून आले. आपल्या सहकाऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी हॉटेलमध्ये हजेरी लावली.

5 / 8

मुंबई इंडीयन्सचे मालक अंबांनी कुटूंबीयसुध्दा या सोहळ्यात पोहोचले होते. नवविवाहीत जोडपं आणि हार्दिक पांड्याने या कुंटूबासोबत फोटोसाठी पोज दिली.

6 / 8

कृणालने केलेल्या प्री-वेडींग फोटोशुटने सोशल मीडियावर धम्माल उडवुन दिली होती. या फोटोनंतरच त्याच्या लग्नाची चर्चा त्याच्या फॅन्समध्ये रंगु लागली. आपल्या लग्नाची बातमी त्याने या फोटोने सोशल मीडियाद्वारे दिली.

7 / 8

कृणालचा लग्न सोहळा ड्रीम्झक्राफ्ट या कंपनीने सजवला होता. सी-फेसिंग अशा या ५ स्टार हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा दोन दिवस चालला होता.

8 / 8

कृणाल आणि पंखुडी दोन वर्षांपुर्वी एका कार्यक्रमात भेटले आणि त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन आता दोघं विवाहबंधनात अडकले. तिचा साधेपणा आणि पाठींबा देणं मला जास्त आवडतं, असं कृणाल पंखुडीविषयी म्हणाला.

टॅग्स :हार्दिक पांड्यामुंबईक्रिकेटमुंबई इंडियन्स