Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photo : अनुष्का शर्माची फोटोग्राफी, विराट कोहलीची स्टाईल; पण, चर्चेत आले लोकेश राहुल अन् अथिया शेट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 18:25 IST

Open in App
1 / 6

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीला लागली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियानं डरहॅम येथे तीन दिवसीय सराव सामना खेळला अन् ते आता नॉटिंग्हॅम येथे दाखल झाले आहेत.

2 / 6

या दौऱ्यावर बीसीसीआयनं खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी दिली होती आणि त्यात खेळाडूंनी कुटुंबीयांसोबत भटकंती केली. विराट कोहली, पत्नी अनुष्का व मुलीसह क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसला.

3 / 6

विराट कोहली, इशांत शर्मा, मयांक अग्रवाल आणि उमेश यादव यांच्यासोबतचे भटकंतीचे फोटो लोकेश राहुलनं त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोत लोकेशसह बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीही दिसत आहे. उर्वरित सर्व खेळाडूही त्यांच्या पत्नीसोबत आहेत.

4 / 6

लोकेश आणि अथिया यांच्या प्रेमाच्या चर्चा काही नवीन नाहीत आणि लोकेशनं बीसीसीआयला अथिया ही त्याची प्रेयसी असल्याचे सांगूनच इंग्लंडला नेल्याचे वृत्त काही इंग्रजी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले होते.

5 / 6

या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल उघड कधीच चर्चा केली नसली तरी या फोटोतून त्यांचं प्रेम काही लपून राहत नाही.

6 / 6

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीलोकेश राहुलअनुष्का शर्माअथिया शेट्टी 
Open in App