Join us

PSLमध्ये स्टार खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी PCBनं वाढवणार मानधन, पण IPLच्या तुलनेत बघा आहेत कुठे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 20:53 IST

Open in App
1 / 4

रमीझ राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रोज क्रांतिकारी निर्णय घेत आहेत. त्यांनी स्थानिक क्रिकेटपटूंच्या मानधनात भरभरून वाढ केली, परंतु ते अध्यक्षपदावर येताच न्यूझीलंड व इंग्लंड यांनी पाकिस्तान दौऱेही रद्द केले. हे दौरे रद्द करण्यामागे सुरक्षेचं कारण होतं, हेही खरे. आता तर रमीझ राजा IPL ला टक्कर देण्याचा विचार करत आहेत.

2 / 4

पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) परदेशी स्टार खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी रमीझ राजांनी त्यांच्या मानधनात वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे. जास्तीत जास्त परदेशी खेळाडूंना करारबद्ध करून आयपीएलला टक्कर देण्याचा मानस त्यांचा असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच त्यांनी पैशांचा पाऊस पाडण्याचा निर्धार केला आहे.

3 / 4

पाकिस्तान सुपर लीगच्या ७व्या पर्वासाठी लवकरच लिलाव होणार असून त्यावेळी या निर्णयाची घोषणा करण्यात येईल. रमीझ राजा PSLमधील फ्रँचायझींची भेट घेणार आहेत. रिपोर्टनुसार महत्त्वाच्या खेळाडूला आता १.८४ कोटी प्रती सिजन देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आता १.१८ कोटी दिले जात आहेत.

4 / 4

आता एवढी रक्कम देऊन ते आयपीएलला टक्कर देऊ शकतील का?; आयपीएलमध्ये महत्त्वाचे खेळाडू सरासरी १० ते ११ कोटींच्या घरात प्रती सिजन मानधन कमावतात. त्या तुलनेल रमीझ राजा देणारी वाढ कुठेय याचा अंदाज न लावलेलाच बरा.

टॅग्स :पाकिस्तानआयपीएल २०२१
Open in App