Join us
Daily Top 2Weekly Top 5

PHOTOS : शोएब मलिक अन् सनाचा रोमँटिक अंदाज; पण कॅप्शनवरून चाहत्यांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 14:38 IST

Open in App
1 / 10

पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याने भारताची स्टार टेनिस स्टार सानिया मिर्झापासून विभक्त होत पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री सना जावेदशी विवाहगाठ बांधली.

2 / 10

शोएब आणि सना नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असतात. आता हे जोडपे स्वित्झर्लंडमध्ये असून, त्यांनी तेथील काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 10

सना आणि शोएबचा रोमँटिक अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. 'एकत्र', हे त्यांचे कॅप्शन ट्रोलर्संना आमंत्रण देऊन गेले. या कॅप्शनचा दाखला देत चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून शोएबची खिल्ली उडवली. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे.

4 / 10

२०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या.

5 / 10

एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.

6 / 10

दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते.

7 / 10

शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडले होते.

8 / 10

१२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले होते. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते.

9 / 10

लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असे आहे.

10 / 10

टॅग्स :शोएब मलिकपाकिस्तानसेलिब्रिटीस्वित्झर्लंड