पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतचे नाते तोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्याने पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. शोएब तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला.
सना जावेद दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. गुरूवारी सर्वत्र बकरी ईदचा सण साजरा केला गेला. शोएब आणि सना यांनी या सणानिमित्त काही खास फोटो शेअर केले.
सना जावेद आणि शोएब मलिक यांच्या रोमँटिक अंदाजावर चाहत्यांनी सडकून टीका केली. पुढच्या ईदपर्यंत दोघे एकमेकांसोबत राहाल ना? अशा आशयाच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या.
एका चाहत्याने म्हटले की, दोघे एकमेकांशी शपथ घेऊन सांगा की, पुढच्या ईदपर्यंत एकमेकांसोबतच राहाल... दुसरीकडे कुठे जाणार नाही.
शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियासोबतचे त्याचे १४ वर्षांचे नाते संपले. सानिया तिचा मुलगा इझान मिर्झा मलिकसोबत दुबईमध्ये लांब राहते. पण ईदनिमित्त ते भारतात आहेत.
सना आणि शोएब यांनी काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. चाहते त्यांना या फोटोंवरून ट्रोल करत आहेत. अनेकांनी खालच्या पातळीवर टीका करत या जोडीला लक्ष्य केले.