पाकिस्तानात सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या महिला क्रिकेटपटूंपैकी एक कायनात इम्तिआज ( Kainat Imtiaz) हिने ३० मार्चला निकाह केला.
कायनातने शुक्रवारी सोशल मडियावर तिच्या निकाह चे फोटो पोस्ट केले. वकार उद्दीन असे तिच्या पतीचे नाव आहे.
कायनातने हो फोटो पोस्ट करताच सहकारी महिला खेळाडू व चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर कायनातने प्रतिक्रिया दिली होती. तिने विराटचे कौतुक करताना त्याल GOAT ( महान खेळाडू) असे म्हटले होते. तिचं ते ट्विट चर्चेत आलं होतं.
कायनातने पाकिस्तानकडून ३० आंततराष्ट्रीय ( १५ वन डे व १५ ट्वेंटी-२०) सामने खेळले आहेत. त्यात तिने २४८ धावा व १५ विकेट्स घेतल्या आहेत.