बहिष्कार टाकला अन् वर्ल्ड कप गमावला! पाक आधी या संघांनी ICC स्पर्धेतील सामना सोडला, पण...

इथं एक नजर टाकुयात पाकिस्तानआधी ICC च्या स्पर्धेत कधी अन् कोणत्या संघाने सामन्यावर बहिष्कार टाकला होता.

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या हंगामाला सुरुवात होण्याआधी पाकिस्तानच्या एका निर्णयामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारच्या आदेशाचा दाखला देत पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधीही ICC स्पर्धेत अशा घटना घडल्या आहेत. पण टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. याचे गंभीर परिणाम पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भविष्यात भोगावे लागू शकतात.

इथं एक नजर टाकुयात पाकिस्तानआधी ICC च्या स्पर्धेत कधी अन् कोणत्या संघाने सामन्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामागचे कारण अन् त्याचा काय परिणाम झाला यासंदर्भातील सविस्तर माहिती.

राजकीय तणावपूर्ण परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतल्यामुळे ICC नं त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली नव्हती. पण श्रीलंकेला वॉकओव्हर मिळाला अन् कमालीची गोष्ट ही की, या हंगामात श्रीलंकेच्या संघाने लाहोरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.

१९९६ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाप्रमाणेच वेस्ट इंडीजच्या संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली होती. दोन गुण गमावल्यावर वेस्ट इंडिजच्या संघाने सेमीफायनलपर्यंत धडक मारली. त्यांच्यावरही अतिरिक्त कोणतीही कारवाई झाली नव्हती.

२००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे आणि युनायटेड किंगडमच्या टोनी ब्लेअर सरकारदरम्यान राजनैतिक तणावामुळे इंग्लंडने झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. ICC नं कोणतीही कठोर भूमिका घेतली नसली तरी या निर्णयामुळे दोन गुण गमावल्यामुळे इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवाली होती.

२००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षेच्या कारणास्तवर नैरोबीला प्रवास करण्यास नकार देत केनियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. मोंबासामधील एका इस्राएली हॉटेलवर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १६ लोकांचा मृत्यू झाला होता. या कारणास्तव न्यूझीलंडने सामना खेळला नाही. ऑकओव्हरच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाला दोन गुण मिळाले. न्यूझीलंडवरही ICC नं कोणतीही कठोर कारवाई केली नव्हती.

ICC च्या स्पर्धेत याआधी सामन्यावर बहिष्कार टाकणाऱ्या संघावर कारवाई झालेली नाही. पण त्यावेळीची परिस्थिती आणि पाकिस्तानची आताची भूमिका यात खूप फरक आहे. सरकारच्या निर्णयाच्या नावाखाली पाकिस्तानने ICC सह BCCI ला नुकसान पोहचवण्याचा नापाक डाव खेळला आहे.

ICC आणि आशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळण्यासंदर्भात BCCI आणि PCB मध्ये खास करार झाला आहे. याच कराराच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थितीनंतरही आशिया कप स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले होते. त्यामुळे आताही पाकिस्तानला सहजा सहजी माघार घेता येणार नाही. बांगलादेशचं नाव सांगून ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल.