Join us  

पाकिस्तान सुपर लीगमध्ये शतक ठोकणारा KKRचा खेळाडू बाकावर; दिल्लीविरूद्ध मिळणार संधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 5:25 PM

Open in App
1 / 10

आयपीएल २०२३ मध्ये इंग्लंडचा खेळाडू जेसन रॉय कोलकाता नाईट रायडर्सचा हिस्सा आहे. मात्र त्याला अद्याप या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

2 / 10

पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने धडाकेबाज फलंदाजी करताना इतिहास रचला होता. इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर जेसन रॉय हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एक भाग आहे. काही दिवसांपूर्वीच तो केकेआरच्या संघात सामील झाला.

3 / 10

मात्र त्याला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. केकेआरच्या संघाच्या अनेक फलंदाजांचा सध्या खराब फॉर्म कायम आहे.

4 / 10

IPL 2022 च्या मिनी लिलावात जेसन रॉयला खरेदीदार मिळाला नाही. कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यावर बोली लावली नाही. पण शाकिब अल हसन आणि श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर त्याचा बदली म्हणून केकेआर संघात समावेश करण्यात आला.

5 / 10

त्याला कोलकाताने २.८ कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने त्यांचा संघात समावेश केला होता. पण बायो-बबलमुळे तो खेळला नाही.

6 / 10

यापूर्वी २०२१ मध्ये तो सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. त्याने हैदराबादसाठी ५ सामन्यात १५० धावा केल्या. आयपीएल २०२३ मध्ये केकेआरची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही.

7 / 10

पंजाब किंग्जविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर केकेआरने सलग दोन सामने जिंकून दमदार पुनरागमन केले. मात्र आतापर्यंत केकेआरचा संघ सलग दोन सामने पराभूत झाला आहे. असे असूनही जेसन रॉयला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही.

8 / 10

सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांनाही या हंगामात विशेष कामगिरी करता आलेली नाही. जेसन रॉय सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

9 / 10

पाकिस्तान सुपर लीग 2023 मध्ये त्याने क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळताना पेशावर झल्मीविरुद्ध विक्रमी खेळी खेळली. यादरम्यान त्याने 63 चेंडूत 145 धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीत 20 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.

10 / 10

जेसन रॉयने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने इंग्लिश संघाकून ५ कसोटी, ११६ वन डे आणि ६४ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इंग्लंडशिवाय तो आयपीएल, पीएसएल, बीपीएल, बीबीएल आणि द हंड्रेडमध्येही खेळतो.

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सपाकिस्तानइंग्लंडटी-20 क्रिकेट
Open in App