Join us  

Mohammad Rizwan : पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेल, विराट कोहली यांनी केला नसेल याचा विचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:22 PM

Open in App
1 / 6

पाकिस्तान संघानं गुरुवारी विक्रमी धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघावर तिसऱ्या ट्वंटी-२० सामन्यातही विजय मिळवून मालिका ३-० अशी जिंकली. मोहम्मद रिझवान व बाबर आजम यांनी तुफान फटकेबाजी करताना २०८ धावांचे लक्ष्य १८.५ षटकांत सहज पार केले.

2 / 6

ब्रेंडन किंग ( ४३), ब्रुक्स ( ४९), डॅरेन ब्राव्हो ( ३४) आणि कर्णधार निकोलस पूरन ( ६४) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं ३ बाद २०७ धावा केल्या. पण, मोहम्मद रिझवान व बाबर आजम यांनी पहिल्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानचा विजय पक्का केला.

3 / 6

रिझवाननं ८७, तर बाबरनं ७९ धावा केल्या. आसीफ अलीनं ७ चेंडूंत २१ धावा चोपून पाकिस्तानला १८.५ षटकांत ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या सामन्यात मोहम्मद रिझवान यानं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, तर बाबर आजमनंही विक्रमांची रांग लावली.

4 / 6

मोहम्मद रिझवाननं तीन सामन्यांच्या या मालिकेत १६०च्या स्ट्राईक रेटनं २०३ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यातील ८७ धावांची खेळी ही त्याची मालिकेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यानं या खेळीसह असा विश्व विक्रम नोंदवला, ज्याचा विचार ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स व बाबर यांनीही केला नसावा.

5 / 6

मोहम्मदनं २०२१ या कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २०३६ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२०त कॅलेंडर वर्षात २०००+ धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्यानंतर बाबरचा क्रमांक येतो त्यानंही या वर्षात १७६९ धावा केल्या आहेत. ख्रिस गेलनं २०१५मध्ये १६६५ धावा केल्या होत्या, तर विराटनं २०१६मध्ये १६१४ धावा केल्या.

6 / 6

ट्वेंटी-२०त सर्वाधिक शतकी भागीदारीच्या विक्रमात रिझवान-बाबर जोडीनं ( ६ शतकी भागीदारी) रोहित शर्मा व लोकेश राहुल यांचा ५ शतकी भागीदारीचा विक्रम मोडला.

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजमविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App