Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Orange Cap List: साई-गिलसह विराटचा जलवा! या शर्यतीत ऑरेंज आर्मीचा क्लासेन ठरतो सर्वात वेगळा

By सुशांत जाधव | Updated: May 17, 2026 06:06 IST

Open in App
1 / 8

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गुजरात टायटन्सच्या सलामी जोडीचा दबदबा दिसून येतो.

2 / 8

गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन याने १३ सामन्यात १५७.८३ च्या सरासरीनं एक शतक आणि ६ अर्धशतकाच्या मदतीने ५५४ धावा केल्या असून तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे.

3 / 8

GT कॅप्टन शुभमन गिल १२ सामन्यातील १२ डावात ५ अर्धशतकाच्या मदतीने १६०.४७ च्या सरासरीसह ५५२ धावा करत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

4 / 8

कॅप्टन्सीच्या रुपात सलग दुसऱ्या हंगामात शुभमन गिलनं ५०० पेक्षा अधिक धावा करण्याचा खास विक्रमही आपल्या नावे केला आहे.

5 / 8

सनरायझर्स हैदराबादचा हेन्रिक क्लासेन याने १२ सामन्यातील १२ डावात १५३ च्या सरासरीसह ५ अर्धशतकाच्या मदतीने ५०८ धावा केल्या आहेत. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

6 / 8

मध्यफळीत फलंदाजी करताना तो सलामीवीरांना टक्कर देताना दिसतोय. त्यामुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील त्याची उपस्थितीत खास आणि लक्षवेधी ठरते.

7 / 8

आरसीबीचा स्टार बॅटर विराट कोहली याने १२ सामन्यातील १२ डावात १ शतक आणि ३ अर्धशतकाच्या मदतीने १६५.७५ च्या सरासरीनं ४८४ धावा केल्या आहेत.

8 / 8

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मानं १२ सामन्यातील १२ डावात १ शतक आणि ३ अर्धशतकाच्या मदतीने २०९ च्या स्ट्राईक रेटनं ४८१ धावा केल्या आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२६शुभमन गिलविराट कोहलीअभिषेक शर्मा