Join us  

२७ ओव्हर्स अन् २६ रन्स...! पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती संपूर्ण टीम, आजही 'रेकॉर्ड' कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:35 AM

Open in App
1 / 10

क्रिकेटच्या इतिहासात आजचा २८ मार्चचा दिवस खूप खास आहे. ६८ वर्षापूर्वी म्हणजे २८ मार्च १९९५ रोजी लेन हटन याच्या नेतृत्वात इंग्लंड टीमनं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवा रेकॉर्ड बनवला होता. इंग्लंडचा हा सामना न्यूझीलंडसोबत होता.

2 / 10

ऑकलँडच्या इडेन पार्कवर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडला केवळ २६ धावात गारद केले होते. हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात नीच्चांक स्कोअर आहे. आजतागायत हा रेकॉर्ड कुणीच मोडला नाही.

3 / 10

इंग्लंडच्या टीमने शानदार सुरुवात करत डुनेडिनच्या ओवलमध्ये खेळलेल्या पहिल्या टेस्टमध्ये ८ विकेट्सने विजय मिळवला होता. ज्यामुळे इंग्लंडची टीम उत्साहात होती. दुसऱ्या टेस्टची पहिली इंनिगही इंग्लंडने चांगली खेळत न्यूझीलंडला अवघ्या २०० रन्सवर ऑलआऊट केले होते.

4 / 10

पहिल्या इंनिंगमध्ये न्यूझीलंडच्या जॉन रिडने ७३ तर बर्ट सटक्लिफने ४९ रन्स बनवले. इंग्लंडकडून ब्रायन स्टॅथम आणि बॉर्ब एपलयार्ड यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेत महत्त्वाची कामगिरी बजावली. न्यूझीलंडनंतर खेळणाऱ्या इंग्लंडने पहिल्या इंनिंगमध्ये २४६ रन्स बनवले.

5 / 10

इंग्लंडचे कॅप्टन लेन हटन यांनी ५३ तर पीटर यांनी ४८ रन्सची खेळी खेळली. इंग्लंडकडे केवळ ४६ रन्सची आघाडी होती. अशावेळी कुणीच चाहत्याने विचार केला नसावा की, न्यूझीलंडला हा मुकाबला आणि कसोटी सामना २० रन्सने गमवावा लागेल.

6 / 10

कसोटी सामनाच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या बॉलरने न्यूझीलंडच्या बॅट्समनला अक्षरश: धूळ चारली. किवी टीमने २७ ओव्हर्समध्ये अवघे २६ रन्स बनवले, न्यूझीलंडची सर्व टीम २६ रन्सवर गारद झाली. न्यूझीलंडची दुसऱ्या इंनिंगमध्ये सर्वात मोठी भागीदारी सहाव्या विकेट्ससाठी झाली.

7 / 10

सहाव्या विकेट्ससाठी ८ रन्सची भागीदारी किवी कॅप्टन ज्योफ रैबोन आणि हैरी केव यांच्यात झाली. न्यूझीलंडच्या बर्ट सटक्लिफ याने ११ रन्स बनवले. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाला दुहेरी रन्स बनवणेही शक्य झाले नाही.

8 / 10

न्यूझीलंडच्या ४ बॅट्समननं रन्सचे काहीच खाते उघडले नाही. ३ फलंदाजांनी १ रन्स केल्या तर इंग्लंडचे वेगवान गोलंदाज बॉब एपलयार्ड आणि ब्रायन स्टॅथम यांनी प्रत्येकी ४-३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजाचा धुव्वा उडवला.

9 / 10

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडपूर्वी सर्वात कमी स्कोअरची नामुष्की साऊथ आफ्रिका टीमवर आली होती. साऊथ आफ्रिकेच्या टीम १९२४ आणि १८९६ मध्ये इंग्लंडविरोधात ३० रन्सवर ऑलआऊट झाली होती.

10 / 10

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय टीमचा सर्वात कमी स्कोअर ३६ रन्सचा आहे. ऑस्ट्रेलिया टीम विरोधात २०२० मध्ये आयोजित डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये भारताने स्कोअर बनवला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात कमी स्कोअर असलेल्या २,३ आणि ४ नंबरवर साऊथ आफ्रिका टीम आहे.

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंडभारत
Open in App