Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:36 IST

Open in App
1 / 6

काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्माचा आणि त्याच्या भावाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात तो त्याच्या कारला स्क्रॅच पडल्यावरून भावाला ओरडताना दिसत होता. आपल्या कारना जपणाऱ्या रोहितने त्याच्या मालकीची लँबॉर्गिनी कार ड्रीम ईलेव्हन जिंकणाऱ्या क्रिकेट फॅनला भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने जो जिंकेल त्याला कार गिफ्ट देणार असल्याचे जाहीर केले होते.

2 / 6

रोहित शर्मा या कारमधून अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसला होता. त्याने सोमवारी या फॅन्टसी क्रिकेटच्या विजेत्याला रोहित लॅम्बोर्गिनी उरुस भेट देऊन टाकली. यावेळी, तो त्या विजेत्याला कारची काळजी घे, असे सांगायला विसरला नाही.

3 / 6

रोहित शर्माची ही कार खूप खास होती. किंमत तर कोटींमध्ये आहेच परंतू, त्याने जागतिक क्रिकेटमध्ये नोव्हेंबर २०१४ मध्ये ठोकलेल्या '२६४' या धावांचा नंबर या कारला होता. यामुळे रोहितसाठी या कारची किंमत केली जाऊ शकत नव्हती.

4 / 6

रोहित शर्माची एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम धावसंख्या २६४ आहे. या नंबरचीच कार त्याने घेतली होती. या कारची किंमत ४.५ कोटी रुपये आहे.

5 / 6

ड्रीम ११ च्या एका जाहिरातीत त्याने त्याची ही कार जो जिंकणार त्याला देणार असल्याची घोषणा केली होती. लोकांना ती एक जाहिरातीचा स्टंट वाटली होती. परंतू, खरोखरच रोहितने ही कार त्या जिंकणाऱ्या चाहत्याला दिली आहे.

6 / 6

रोहितने त्या फॅनला ती कार दिली, त्याच्याकडे चावी सोपविली आणि चक्क ऑटोरिक्षातून घरी परतल्याचे सांगितले जात आहे. चाहत्यांना अजूनही रोहितवर विश्वास बसत नाहीय. यामुळे ते रोहितला त्याची कार परत मिळेल, असे वाटत आहे.

टॅग्स :रोहित शर्मालँबॉर्घिनी