१) डेव्हिड बून: १९९१ मध्ये भारतासोबतच्या एकदिवसीय सामन्यात बूनने १६८ चेंडूत नाबाद १०२ धावा केल्या होत्या. हा एकदिवसीय इतिहासातील सर्वात संथ शतक करण्याचा विक्रम आहे.
२) रमीज राजा: या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी फलंदाज रमीज राजा आहे. १९९२ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने १५७ चेंडूत शतक पूर्ण केले आणि एकूण १५८ चेंडूत १०२ धावा केल्या.
३) जेफ मार्श : ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज जेफ मार्श याने १९८९ मध्ये इंग्लंडविरुद्ध १५६ चेंडूत शतक झळकावले होते. त्याने १६२ चेंडूत नाबाद १११ धावा केल्या होत्या.
४) स्कॉट स्टायरिस: न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिस या यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. २००७ च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध त्याने १५२ चेंडूत शतक पूर्ण केले, त्याने १५७ चेंडूत १११ धावा केल्या.
५) टॉम कूपर: नेदरलँड्सकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या टॉम कूपरने २०१० मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध फक्त १५१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने एकूण १५५ चेंडूत १०१ धावा केल्या होत्या.