आता क्रिकेट हा केवळ एक खेळ नव्हे, तर एक मोठा उद्योग (इंडस्ट्री) बनला आहे. अनेक क्रिकेटर्स खेळासोबतच ब्रँड एंडोर्समेंट आणि बिझनेस व्हेंचरद्वारे कोट्यवधी रुपये कमवत आहेत. या यादीत भारताच्या तीन दिग्गज क्रिकेटर्सचा समावेश आहे, ज्यांची एकूण संपत्ती १०० मिलियन डॉलर्सपेक्षाही अधिक आहे. तर जाणून घेऊयात जगातील टॉप ५ श्रीमंत क्रिकेटर्ससंदर्भात
1. सचिन तेंडुलकर - क्रिकेटचा देव म्हणवला जाणारा सचिन तेंदुलकर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही त्याची कमाई सातत्याने सुरू आहे. तो मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक (मेंटोर) आहे. तसेच अनेक क्रीडा अकादमी, रेस्टॉरंट्स आणि स्टार्टअपमध्ये त्याची गुंतवणूकही आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार त्याची संपत्ती 170 मिलियन डॉलर (सुमारे 1400 कोटी रुपये+) एवढी आहे.
2. विराट कोहली - या बाबतीत भारतीय क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. क्रिकेट कॉन्ट्रॅक्टशिवाय, तो त्याचा फिटनेस आणि फॅशन ब्रँड्स (Rogue, One8), जाहिराती आणि रिअल इस्टेटमधूनही मोठा नफा कमवतो. मुंबई आणि गुरुग्राममध्ये त्याची कोट्यवधींची मालमत्ता आहे. त्याच्या संपत्तीचा विचार करता, माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याच्याकडे 127 मिलियन डॉलर (सुमारे 1050 कोटी रुपये+) एवढी संपत्ती आहे.
3. एमएस धोनी - भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला एमएस धोनी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिकेटशिवाय, शेती, जिम चेन, उत्पादन कंपनी आणि टेक स्टार्टअप्समध्येही त्याची गुंतवणूक आहे. चेन्नई सुपर किंग्जमध्येही त्याचा वाटा आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याच्याकडे 123 मिलियन डॉलर (सुमारे 1000 कोटी रुपये+) एवढी संपत्ती आहे.
4. रिकी पॉन्टिंग - ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने निवृत्तीनंतर कोचिंग आणि कॉमेंट्रीसह आपली कारकीर्द सुरू ठेवली आहे. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा प्रशिक्षकही राहिला आहे आणि टीव्ही तथा डिजिटल माध्यमांद्वारे तो चांगले पैसे कमावतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याच्याकडे 70 मिलियन डॉलर (सुमारे 580 कोटी रुपये+) एवढी संपत्ती आहे.
5. ब्रायन लारा - या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा पाचव्या स्थानावर आहे. तो कॉमेंट्री, प्रशिक्षण आणि ब्रँड एंडोर्समेंटद्वारे सक्रिय असतो. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा प्रशिक्षकही राहिला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याच्याकडे 60 मिलियन डॉलर (सुमारे 500 कोटी रुपये+) एवढी संपत्ती आहे.