Join us  

९९.९४ ची सरासरीच नाही तर डॉन ब्रॅडमन यांचे हे विक्रमसुद्धा अजूनही आहेत अबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 2:40 PM

Open in App
1 / 9

क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाज अशी गणना होणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांचा आज ११२ वा जन्मदिन. त्यांना निवृत्त होऊन ७२ वर्षे झाली. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी नोंदवलेले अनेक विक्रम अद्यापही अबाधित आहेत. २०व्या शतकाच्या पूर्वार्धात क्रिकेटविश्व गाजवणाऱ्या ब्रॅडमन यांच्या अनेक विक्रमांच्या आसपासही जाणे नंतरच्या फलंदाजांना शक्य झालेले नाही. ब्रॅडमन यांच्या अद्याप अतूट राहिलेल्या विक्रमांचा घेतलेला हा आढावा.

2 / 9

ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ९९.९४ च्या सरासरीने ६९९६ धावा फटकावल्या. ब्रॅडमन यांचा सरासरीच्या या विक्रामाच्या आसपासही कुठल्या फलंदाजाला पोहोचता आलेले नाही.

3 / 9

डॉन ब्रॅडमन यांनी १९३० च्या अॅशेस मालिकेतील एका कसोटी सामन्यामध्ये एका दिवसात त्रिशतक फटकावण्याची किमया साधली होती. हा विक्रमही अद्याप अबाधित आहे. भारताचा वीरेंद्र सेहवाग २००९ मध्ये या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र त्याची ही संधी थोडक्यात हुकली.

4 / 9

सर डॉन ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १२ वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला. त्यांचा हा विक्रमसुद्धा अद्याप अबाधित आहे.

5 / 9

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध पाच हजारहून अधिक धावा फटकावणारे ब्रॅडमन हे एकमेव फलंदाज आहेत. ब्रॅ़डमन यांनी इंग्लंडविरुद्ध एकूण ५ हजार २८ धावा फटकावल्या.

6 / 9

एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके फटकावण्याचा विक्रमही ब्रॅडमन यांच्या नावे आहे. ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्ध १९ शतके फटकावली होती.

7 / 9

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रमही ब्रॅडमन यांच्या नावे आहे. १९३० च्या अॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी ९७४ धावा फटकावल्या होत्या.

8 / 9

ब्रॅडमन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २०१.५० च्या सरासरीने ८०६ धावा फटकावल्या होत्या.

9 / 9

ब्रॅडमन यांनी जसा कसोटी क्रिटेमध्ये ९९.९४ च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडला तशीच धावांची बरसात त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये केली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ब्रॅडमन यांनी २३४ सामने खेळताना ९५.१४ इतक्या जबरदस्त सरासरीने २८ हजार ६७ धावा फटकावल्या.

टॅग्स :सर डॉन ब्रॅडमनआंतरराष्ट्रीय क्रिकेटआॅस्ट्रेलिया