फक्त धोनीचं नव्हे तर या खेळाडूंनीही ट्रेडमार्कसह निकनेमचं केलंय रजिस्ट्रेशन

एक नजर ट्रेंडमार्क सेट करणाऱ्या खेळाडूंवर...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याने 'कॅप्टन कूल' या टोपण नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. संबंधित ट्रेडमार्क क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा प्रशिक्षण सुविधा, क्रीडा कोचिंग तसेच अन्य श्रेणीतून नोंदणीकृत करण्यात आले आहे. त्याच्या अर्जावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही तर धोनीला अधिकृतरित्या या नावाचा मालिकी हक्क प्राप्त होईल.

महेंद्रसिंह धोनी आधी क्रीडा जगतातील अन्य काही स्टार्स मंडळींनीही ट्रेडमार्क अन् निकनेमसंदर्भातील असा निर्णय घेतला आहे. इथं एक नजर त्या खेळाडूंवर...

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने 'VK' लोगोसह ट्रेडमार्कची नोंदणी केली आहे.

क्रिकेट जगतातील शतकांचा बादशहा सचिन तेंडुलकर याला 'मास्टर ब्लास्टर' नावाने ओळखले जाते. दिग्गज क्रिकेटरनं हे निकनेम (टोपण नाव) ट्रेंडमार्कच्या रुपात नोंदणीकृत केले आहे.

रोहित शर्मानं 'हिटमॅन' हे नाव ट्रेडमार्कच्या रुपात नोंदणीकृत करून घेतले आहे.

ख्रिस्टियानो रोनाल्डो हा फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानावर असलेल्या रोनाल्डोनं "CR7" हा ट्रेडमार्क आपल्या मालकीचा करुन घेतलाय. रोनाल्डोचा "CR7" हा ब्रँड कपडे, सुंगधी द्रव्ये यासह अन्य काही क्षेत्रात लोकप्रिय आहे.

धावपटू उसेन बोल्ट हा शर्यत पूर्ण केल्यावर आपले हात उंचावून खास पोझ देताना तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल. त्याची ही जगप्रसिद्ध पोझ या खेळाडूसाठी "लायटनिंग बोल्ट" या ट्रेडमार्क बनलीये.

महिला टेनिस स्टार सेरेना विल्यम्स हिने आपल्या नावाच्या लोगोसह ट्रेडमार्कची मालकी कमावली असून फॅशन आणि अन्य व्यवसायात ती याचा वापर करते.